Myanmar civilians protest: म्यानमारमध्ये चीनविरोधात निदर्शनं, मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले लोक

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 12, 2021 04:42 PM2021-02-12T16:42:06+5:302021-02-12T16:43:54+5:30

वेगवेगळ्या वयोगटातील लोक चीनविरोधातील या निदर्शनात सामील झाले होते. यावेळी समाजातील सर्व लोक या निदर्शनात पाहायला मिळाले. गेल्या 1 फेब्रुवारीला म्यानमारच्या लष्कराने सत्तापालट केल्याची घटना घडली आहे. (Myanmar civilians protest against China)

Myanmar civilians protest against china for supporting military coup | Myanmar civilians protest: म्यानमारमध्ये चीनविरोधात निदर्शनं, मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले लोक

Myanmar civilians protest: म्यानमारमध्ये चीनविरोधात निदर्शनं, मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले लोक

Next
ठळक मुद्देम्यानमारच्या जनतेने शुक्रवारी चीनविरोधात जोरदार निदर्शनं केलीवेगवेगळ्या वयोगटातील लोक चीनविरोधातील या निदर्शनात सामील झाले होते.गेल्या 1 फेब्रुवारीला म्यानमारच्या लष्कराने सत्तापालट केल्याची घटना घडली आहे.

यंगून -म्यानमारमध्ये सत्तापालटानंतर चीनने (China) लष्करशहा जनरल मीन आंग हलिंगचे समर्थन केले आहे. या पार्श्वभूमीवर म्यानमारच्या (Myanmar) जनतेने शुक्रवारी चीनविरोधात जोरदार निदर्शनं केली. यावेळी चीनच खरा गुन्हेगार आहे. तो शांतता प्रीय देशाच्या जीवनात अशांतता निर्माण करत आहे, असे निदर्शकांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर "त्यांनी लष्कराला लोकशाही पणाला लावण्यासाठी भाग पाडले," असेही एका निदर्शकाने म्हटले आहे. (Myanmar civilians protest against china)

वेगवेगळ्या वयोगटातील लोक चीनविरोधातील या निदर्शनात सामील झाले होते. यावेळी समाजातील सर्व लोक या निदर्शनात पाहायला मिळाले. "लष्करशहाचे समर्थन करणे बंद करा," असे लिहिलेले अनेक बॅनरदेखील यावेळी निदर्शकांच्या हातात दिसून आले. यापूर्वी म्यानमारमध्ये जनरल मीन आंग हलिंगविरोधातही लाखो लोकांनी निदर्शन केले होते.

म्यानमारमध्ये पोलिसांची आंदोलनकर्त्यांवर कारवाई; निदर्शकांवर पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा

गेल्या 1 फेब्रुवारीला म्यानमारच्या लष्कराने सत्तापालट केल्याची घटना घडली आणि नोव्हेंबर 2020 च्या निवडणुकीत गोंधळ झाल्याचा आरोप करत नॅशनल लीग ऑफ डेमोक्रसीचे (NLD) लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेले सरकार उखडण्यात आले. 

अनेक नेते म्यानमार लष्कराच्या ताब्यात -
म्यानमारमध्ये अशांतता निर्माण करण्यावरून नेपाळ, हाँगकाँग आणि इतर काही देशांतही चीन विरोधात निदर्शने झाली आहेत. सध्या मानमारमधील अनेक नेते म्यानमार लष्कराच्या ताब्यात आहेत. यात आंग सान सू की आणि राष्ट्रपती विन म्यिंट यांचाही समावेश आहे. याच बरोबर सध्या म्यानमारमध्ये एका वर्षाच्या आणीबाणीचीही घोषणा करण्यात आली आहे.

म्यानमार : सत्तांतरानंतर आंग सान सू कुठे आहेत याची माहिती नाही; ४०० पेक्षा अधिक खासदार नजरकैदेत

म्यानमारमध्ये पोलिसांची आंदोलनकर्त्यांवर कारवाई - 
म्यानमारमध्ये सत्तापालटाच्या विरोधात सातत्याने निदर्शने सुरू आहेत. निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी कारवाईदेखील केली आहे. ही निदर्शने अवैध आहेत, असे पोलिसांनी आधीच सांगितले असले तरी शेकडो लोक रस्त्यांवर उतरत आहेत. गेल्या मंगळवारी या निदर्शकांना हटविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबारही केला होता. तसेच निदर्शकांवर पाण्याच्या फवाऱ्यांचाही मारा केला होता. म्यानमारमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे शहर असलेल्या मंडालेमध्ये निदर्शक मोठ्या संख्येने रस्त्यांवर उतरले होते. तेथून पोलिसांनी 24 पेक्षा अधिक जणांना अटक केली होती.

म्‍यानमारच्या सत्तापालटानं चीनची झोप उडाली; लष्कर सत्तेत आल्यानं ड्रॅगनला सतावतेय मोठी भीती!

 

Web Title: Myanmar civilians protest against china for supporting military coup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.