Myanmar Earthquake: म्यानमारमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, लोक घाबरले; आतापर्यंत एक हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 17:25 IST2025-03-29T17:23:41+5:302025-03-29T17:25:14+5:30
शुक्रवारी म्यानमारमध्ये मोठा भूकंप झाला. यामध्ये आतापर्यंत एक हजार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Myanmar Earthquake: म्यानमारमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, लोक घाबरले; आतापर्यंत एक हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू
शुक्रवारी म्यानमारमध्ये मोठा भूकंप झाला. यामध्ये आतापर्यंत एक हजार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आज शनिवारीही पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, म्यानमारमध्ये आज दुपारी २.५० वाजता रिश्टर स्केलवर ४.७ तीव्रतेचा भूकंप झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपात १००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जखमींची संख्या २४०० पेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे.
भारताचे ऑपरेशन ब्रह्मा! 'खाण्याचे पदार्थ, टेंट आणि स्लिपिंग बॅग'; म्यानमारला काय काय पाठवले?
या विनाशकारी भूकंपानंतर म्यानमारमधील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, शनिवारीही म्यानमारच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, म्यानमारमध्ये आज दुपारी २.५० वाजता रिश्टर स्केलवर ४.७ तीव्रतेचा भूकंप झाला.
शुक्रवारी म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपाचे केंद्र मंडालेजवळ होते. यामुळे बँकॉक, थायलंड आणि म्यानमारमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे म्यानमारमध्ये मोठे नुकसान झाले आहे. यामुळे येथे अनेक इमारती कोसळल्या.
आजही धक्के जाणवले
म्यानमारमधील बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. भूकंपाची तीव्रता ७.७ इतकी होती आणि त्यानंतर अनेक आफ्टरशॉक आले, त्यापैकी एकाची तीव्रता ६.४ होती. शनिवारीही म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
थायलंडमध्येही भूकंपामुळे नुकसान
या भूकंपाचा परिणाम थायलंडमध्येही दिसून आला. बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली ३३ मजली इमारत भूकंपामुळे कोसळली. इमारत कोसळल्याने आजूबाजूच्या परिसरात धूळ आणि कचरा पसरला.