शांततेने सत्ता हस्तांतरणाचे म्यानमार सरकारचे आश्वासन

By admin | Published: November 12, 2015 12:05 AM2015-11-12T00:05:15+5:302015-11-12T00:05:15+5:30

गेल्या रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकशाहीवादी नेत्या आँग सॅन सू की यांच्या पक्षाने निर्विवाद यश मिळविल्यानंतर लष्कर समर्थित विद्यमान सरकारने शांततेने सत्ता हस्तांतरण करण्याचे

Myanmar government assures power transfer of peace | शांततेने सत्ता हस्तांतरणाचे म्यानमार सरकारचे आश्वासन

शांततेने सत्ता हस्तांतरणाचे म्यानमार सरकारचे आश्वासन

Next

यांगून : गेल्या रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकशाहीवादी नेत्या आँग सॅन सू की यांच्या पक्षाने निर्विवाद यश मिळविल्यानंतर लष्कर समर्थित विद्यमान सरकारने शांततेने सत्ता हस्तांतरण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या देशात सू की यांचे सरकार येणे ही अटळ बाब ठरली आहे.
अध्यक्ष थिन सेन यांनी यासंदर्भात लिहिलेले एक पत्र माहितीमंत्री ये हुतूत यांनी सू की यांना दिले आहे. जनतेने दिलेल्या कौलाचा आदर करीत सत्ता हस्तांतरण केले जाईल, असे आश्वासन अध्यक्षांनी या पत्रात दिले आहे. या पत्रातच अध्यक्षांनी सू की यांचे अभिनंदन केले आहे. मात्र, स्वत: अध्यक्षांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.
यापूर्वी १९९० मध्येही सू की यांच्या पक्षानेच विजय मिळविला होता; पण त्यावेळी लष्कराने तो निकाल मान्य केला नव्हता. आताही तसेच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना आता सत्ता हस्तांतरणाचे आश्वासन सरकारने दिले आहे.
म्यानमारमधील निवडणुकीत घवघवीत यश मिळविल्यानंतर येथील लोकशाहीसमर्थक नेत्या आँग सॅन सू की यांनी देशाचे अध्यक्ष आणि शक्तिशाली लष्कर यांच्याशी राष्ट्रीय मनोमिलनाचे आवाहन तत्पूर्वी केले होते.
रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सू की यांच्यात नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी या पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले असून संसदेतील कनिष्ठ सभागृहातील आतापर्यंत घोषित निकालांपैकी ९० टक्के जागा जिंकल्या आहेत.
मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी आतापर्यंत नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी या पक्षाला विजयी घोषित केलेले नाही; पण जाहीर झालेले निकाल पाहता सू की यांची राजवट अटळ आहे. या देशात गेल्या ५० वर्षांपासून लष्कर किंवा त्यांच्या सहकारी पक्षांची सत्ता राहिलेली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Myanmar government assures power transfer of peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.