म्यानमारच्या स्यू ची यांना सहा वर्षांचा कारावास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 10:44 AM2022-08-16T10:44:57+5:302022-08-16T10:45:13+5:30
Suu Kyi : न्यायालयाने स्यू ची यांना अतिरिक्त सहा वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली.
बँकॉक : म्यानमारमधील न्यायालयाने पदच्युत नेत्या आंग सान स्यू ची यांना आणखी सहा वर्षांचा कारावास सुनावला आहे. स्यू ची यांच्यावर भ्रष्टाचाराच्या चार प्रकरणांचा ठपका ठेवण्यात आला आहे. गेल्या वर्षी म्यानमारमधील लष्कराने उठाव करत स्यू ची यांची राजवट उलथवून टाकली होती. त्यानंतर लष्करी राजवटीने स्यू ची यांना तुरुंगात डांबले. सोमवारी म्यानमारमधील न्यायालयात त्यांच्यावरील खटल्याची सुनावणी झाली. त्यात भ्रष्टाचारातून मिळालेल्या पैशांतून स्यू ची यांनी घर बांधले असेही आरोपपत्रात म्हटले आहे. न्यायालयाने स्यू ची यांना अतिरिक्त सहा वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली.