Myanmar: धक्कादायक! 3500 फूट उंचीवरील विमानावर गोळीबार, विमानाचा पत्रा छेदून गोळी लागल्याने प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 03:47 PM2022-10-02T15:47:46+5:302022-10-02T15:49:23+5:30

Myanmar National Airlines: आकाशात उडणाऱ्या विमानावर झालेल्या गोळीबारात प्रवासी जखमी झाला आहे.

Myanmar News | plane was in sky , firing from ground and passenger sitting in plane got injured | Myanmar: धक्कादायक! 3500 फूट उंचीवरील विमानावर गोळीबार, विमानाचा पत्रा छेदून गोळी लागल्याने प्रवासी जखमी

Myanmar: धक्कादायक! 3500 फूट उंचीवरील विमानावर गोळीबार, विमानाचा पत्रा छेदून गोळी लागल्याने प्रवासी जखमी

googlenewsNext

Myanmar News:म्यानमारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आकाशात उडणाऱ्या विमानावर एका व्यक्तीने गोळीबार केला आणि विमानात बसलेल्या प्रवाशाला गोळी लागली. 'द सन' च्या वृत्तानुसार, म्यानमार नॅशनल एअरलाइन्सचे विमान 63 प्रवाशांना घेऊन लोईकाव (पूर्वेकडील काया राज्याची राजधानी) विमानतळावर उतरणार होते, तेव्हा ही घटना घडली. विमान सुमारे 3500 फूट उंचीवर उडत होते. 

सोशल मीडियावर या घटनेशी संबंधित फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये विमानाच्या बाहेरील आवरणात घुसून गोळी प्रवाशाला लागल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. दुसर्‍या फोटोत विमानात बसलेल्या प्रवाशाला गोळी लागल्याचे आणि तो कपड्याने रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. लोईकाव येथील म्यानमार नॅशनल एअरलाइन्सच्या कार्यालयाने सांगितले की, या घटनेनंतर शहरातील सर्व उड्डाणे अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहेत.

म्यानमारच्या सरकारने बंडखोर सैन्याने विमानावर गोळीबार केल्याचा आरोप केला. पण, बंडखोर गटांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. म्यानमारच्या सत्ताधारी लष्करी सरकारचे प्रवक्ते मेजर जनरल झॉ मिन तुन यांनी सरकारी टीव्हीला सांगितले की, "प्रवासी विमानावरील हल्ल्याचा हा प्रकार युद्धगुन्हा आहे. या घटनेचा मोठ्या प्रमाणावर निषेध केला पाहिजे." दरम्यान, लष्कराने लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार उलथून टाकल्यानंतर गेल्या वर्षी सत्ता काबीज केली होती. तेव्हापासून काया राज्यात लष्कर आणि बंडखोर गटांमध्ये तीव्र संघर्ष होत आहे.

Web Title: Myanmar News | plane was in sky , firing from ground and passenger sitting in plane got injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.