म्यानमारच्या राष्ट्रपतींकडून 83 कैद्यांची शिक्षा माफ
By admin | Published: April 17, 2016 10:56 AM2016-04-17T10:56:28+5:302016-04-17T10:56:28+5:30
म्यानमारचे राष्ट्रपती तीन क्वा यांनी पदाची सूत्रे हाती घेताच पहिल्याच दिवशी 83 कैद्यांची शिक्षा माफ करण्याच्या कागदावर स्वाक्षरी केली आहे.
ऑनलाइन लोकमत
म्यानमार, दि. १७- म्यानमारचे राष्ट्रपती तीन क्वा यांनी पदाची सूत्रे हाती घेताच पहिल्याच दिवशी 83 कैद्यांची शिक्षा माफ करण्याच्या कागदावर स्वाक्षरी केली आहे. राजकीय कैद्यांनाही शिक्षेतून माफी देण्याचा विचार असल्याचं यावेळी राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तीन क्वा यांचे सल्लागार आणि नॅशनल लीग डेमोक्रेसीचे नेते आंग सान सू की यांच्या निर्देशानुसार 83 कैद्यांना मुक्त करण्यात आलं आहे.
म्यानमारच्या आगामी येणा-या नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर या कैद्यांना शिक्षेतून मुक्तता देण्यात आली आहे. शिक्षेतून मुक्त झालेल्या कैद्यांनी आम्हाला फार आनंद झाला आहे. देशाला समन्वय साधणारं नेतृत्व लाभलं असल्याचंही यावेळी म्हटलं आहे. राष्ट्रपतींनी 200 राजकीय कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे सूतोवाच केले आहेत.
राष्ट्रपती तीन क्वा यांच्या निर्णयामुळे शिक्षणासाठी आंदोलन केल्यानं वर्षभराहून अधिक काळ जेलमध्ये खितपत पडलेल्या डझनाहून अधिक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. राजकीय कार्यकर्त्यांना झालेली शिक्षा माफ करणार असल्याचं आश्वासनंही यावेळी राष्ट्रपती तीन क्वा यांनी दिलं आहे.