आफ्रिकेतील या देशात पसरला रहस्यमय आजार, रक्ताच्या उलट्या होऊन १५ जणांचा मृत्यू, ५० जणांना संसर्ग

By बाळकृष्ण परब | Published: February 9, 2021 11:38 AM2021-02-09T11:38:44+5:302021-02-09T11:39:42+5:30

Tanzania Mystery Disease: एकीकडे जगभरात कोरोनाचा फैलाव सुरू असतानाच आफ्रिकेमधील टंझानियामध्ये एक रहस्यमय आजार पसरला आहे.

A mysterious disease has spread in African country Tanzania, 15 people have died, 50 people have been infected | आफ्रिकेतील या देशात पसरला रहस्यमय आजार, रक्ताच्या उलट्या होऊन १५ जणांचा मृत्यू, ५० जणांना संसर्ग

आफ्रिकेतील या देशात पसरला रहस्यमय आजार, रक्ताच्या उलट्या होऊन १५ जणांचा मृत्यू, ५० जणांना संसर्ग

Next
ठळक मुद्देटंझानियामध्ये पसरलेल्या या रहस्यमय आजारामुळे बाधित झालेल्यांना रक्ताच्या उलट्या होत आहेतआतापर्यंत या आजारामुळे १५ जणांचा मृत्यू झाला आहेआतापर्यंत या आजारामुळे ५० जण बाधित झाल्याचे सांगण्यात येत आहे

दार ए सलाम - एकीकडे जगभरात कोरोनाचा फैलाव सुरू असतानाच आफ्रिकेमधील टंझानियामध्ये एक रहस्यमय आजार पसरला आहे. या अज्ञात आजारामुळे बाधित झालेल्या लोकांना रक्ताच्या उलट्या होत आहेत. यादरम्यान, टंझानिया सरकारने रहस्यमय आजाराची माहिती जाहीर करणाऱ्या चुन्या जिल्ह्याच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी फेलिस्ता किसांदू यांना निलंबित केले आहे.

टंझानियामध्ये पसरलेल्या या रहस्यमय आजारामुळे बाधित झालेल्यांना रक्ताच्या उलट्या होत आहेत. आतापर्यंत या आजारामुळे १५ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत या आजारामुळे ५० जण बाधित झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, किसांदू यांनी सांगितले की, पाऱ्याच्या संसर्गाचा तपास करण्यासाठी रक्ताच्या नमुन्यांचा तपास करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत.

मात्र टंझानियाच्या आरोग्य मंत्रालयाने कुठल्याही प्रकारच्या संसर्गाचे संकेत दिसत नसल्याचे म्हटले आहे. तसेच अनावश्यकरीत्या भीती पसरवल्याप्रकरणी किसांदू यांना निलंबित करण्यात आल्याचे सांगितले. किसांदू यांनी एका वृत्त संस्थेला सांगितले होते की, बहुतांश पुरुष रुग्णांमध्ये पोट आणि अल्सरचा त्रास जाणवला. आणि त्यांना सिगारेट तसेच हार्ड ड्रिंकचा वापर न करण्याचा सल्ला देण्यात आला होता.

त्यांनी सांगितले होते की, वरिष्ठ सरकारी केमिस्ट रक्त आणि पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करणार आहेत. जेणेकरून पाऱ्यामुळे झालेल्या प्रदूषणाची माहिती घेता येईल. दरम्यान, या रहस्यमय आजारामुळे झालेले मृत्यू हे इफूम्बोच्या एका वॉर्डमध्ये झाले आहेत. या वॉर्डमध्ये भरती करण्यात आलेल्या रुग्णांना रक्ताची उलटी झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मात्र टंझानियाचे आरोग्यमंत्री डोरोथी ग्वाजिमा यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच किसांदू यांना लोकांमध्ये भीती निर्माण केल्या प्रकरणी १० दिवसांसाठी निलंबित करण्याचा सल्ला दिला आहे.

Web Title: A mysterious disease has spread in African country Tanzania, 15 people have died, 50 people have been infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.