जगातील सर्वात मोठ्या तेलाच्या पाइपलाइनजवळ दिसली रहस्यमय वस्तू, 'या' देशावर संशय!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 07:16 PM2023-03-29T19:16:08+5:302023-03-29T19:19:34+5:30

डेन्मार्कच्या संरक्षण मंत्रालय आणि ऊर्जा एजन्सीला नॉर्ड स्ट्रीम पाइपलाइनजवळ एक रहस्यमय गोष्ट दिसून आली आहे.

mysterious object found near nord stream norway doubt russian spying | जगातील सर्वात मोठ्या तेलाच्या पाइपलाइनजवळ दिसली रहस्यमय वस्तू, 'या' देशावर संशय!

जगातील सर्वात मोठ्या तेलाच्या पाइपलाइनजवळ दिसली रहस्यमय वस्तू, 'या' देशावर संशय!

googlenewsNext

कोपेनहेगन

डेन्मार्कच्या संरक्षण मंत्रालय आणि ऊर्जा एजन्सीला नॉर्ड स्ट्रीम पाइपलाइनजवळ एक रहस्यमय गोष्ट दिसून आली आहे. डेन्मार्कनं आता ही वस्तू बाहेर काढण्याचा पर्यत्न करत आहे. कारण रशियानं पाइपलाइन उडवण्यासाठी एखादं शस्त्र तर लावलेलं नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे. 

डेन्मार्कनं शेजारील देश स्कॅंडिनेवियामध्ये रशियाच्या वाढत्या हालचालींवर सातत्यानं नजर ठेवून आहे. तेलाच्या पाइपलाइनजवळ आढळलेली संशयास्पद वस्तू रशियाचंच एक हत्यार आहे ज्याचा स्फोट होऊ शकलेला नाही, असा संशय आहे. याबाबत रशियानं म्हटलंय की जर डेन्मार्कला जर ती वस्तू काढायची असेल तर ती चांगली गोष्ट आहे. पण त्याआधी ती वस्तू नेमकी काय आहे याची खात्री करून घ्या, असा सल्ला रशियानं दिला आहे. 

नॉर्ड स्ट्रीम पाइपलाइनजवळच असलेली सिलिंडर सारखी वस्तू जवळपास १६ इंच लांबीची आणि ४ इंच व्यासाची आहे. ही वस्तू नेमकी काय आहे याची माहिती कळू शकलेली नाही. यातून नेमकं काय काम होणार होतं हेही ठावूक नाही. वस्तू बाहेर काढल्यानंतरच त्याबद्दल अधिक माहिती कळू शकेल. रहस्यमय वस्तू आढळून आली तेव्हा डेन्मार्क सरकारनं तातडीनं नॉर्ड स्ट्रीम पाइपलाइनच्या देखभालीचे आदेश दिले आहेत. 

नॉर्ड स्ट्रीम काय आहे?
नॉर्ड स्ट्रीम पाइपलाइनमधून तेलाचा पुरवठा होतो. ही पाइपलाइन समुद्र तळाशी बसवण्यात आली आहे. एकूण दोन पाइपलाइन आहेत. याचं काम २०११ साली पूर्ण झालं होतं. नॉर्ड स्ट्रीम-१ रशियाच्या वायबोर्गच्या लेनिनग्राद ते जर्मनीच्या ग्रिफ्सवॉर्ल्डजवळील लुबमिनपर्यंत जाते. 

नॉर्ड स्ट्रीम रशिया, फिनलँड, स्वीडन, डेन्मार्क आणि जर्मनीसह अनेक देशांना विशेष आर्थिक क्षेत्र तसंच रशिया, डेन्मार्क आणि जर्मनीच्या जलक्षेत्रातून जाते. जर्मनीमध्ये पाइपलाइन बाल्टिक सागर पाइपलाइन आणि उत्तरी युरोपीय पाइपलाइनशी जोडते. जी पुढे युरोपीय ग्रीडला जोडली जाते. 

Web Title: mysterious object found near nord stream norway doubt russian spying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.