Oumuamua: पृथ्वीजवळून गेली रहस्यमय वस्तू, अनेक दिवसांपासून बनली होती गुढ, आता हावर्डने केला मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 05:03 PM2021-11-16T17:03:06+5:302021-11-16T17:04:37+5:30

Oumuamua:  सन २०१७ मध्ये पृथ्वीच्या जवळून गेलेले इंटरस्टेलर ऑब्जेक्ट Oumuamua तज्ज्ञांसाठी एक आव्हान बनले आहे. या रहस्यमय ऑब्जेक्टला तज्ज्ञ एका पाठोपाठ एक नवनवी व्याख्या देत आहेत. त्यामुळे त्याबाबत मांडलेली आधीची थिअरी ही निरर्थक ठरत आहे.

The mysterious object that passed close to the earth, which had been a mystery for many days, now made a big claim by Howard | Oumuamua: पृथ्वीजवळून गेली रहस्यमय वस्तू, अनेक दिवसांपासून बनली होती गुढ, आता हावर्डने केला मोठा दावा

Oumuamua: पृथ्वीजवळून गेली रहस्यमय वस्तू, अनेक दिवसांपासून बनली होती गुढ, आता हावर्डने केला मोठा दावा

googlenewsNext

वॉशिंग्टन -  सन २०१७ मध्ये पृथ्वीच्या जवळून गेलेले इंटरस्टेलर ऑब्जेक्ट Oumuamua तज्ज्ञांसाठी एक आव्हान बनले आहे. या रहस्यमय ऑब्जेक्टला तज्ज्ञ एका पाठोपाठ एक नवनवी व्याख्या देत आहेत. त्यामुळे त्याबाबत मांडलेली आधीची थिअरी ही निरर्थक ठरत आहे. आता याबाबत एक नवी व्याख्या समोर आली आहे. यामध्ये सिगारेटच्या आकाराचे हे ऑब्जेक्ट हे नायट्रोजन आइसबर्ग नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याआधी हे ऑब्जेक्ट म्हणजे एलियन शिप, अॅस्ट्रॉईडचा तुकडा आणि त्यानंतर नायट्रोजन आइसबर्ग असल्याचा दावा करण्यात आला होता.

हावर्डच्या संशोधकांनी सांगितले की, हे ऑब्जेक्ट नायट्रोजन आइसबर्ग असण्याची शक्यता अशक्य आहे. त्यांनी न्यू अॅस्ट्रोनॉमी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या शोधामध्ये असे का असू शकते याची माहिती दिली आहे. तत्पूर्वी ऑक्टोबर २०१७ मध्ये Oumuamua सौरमालेमधून जात असल्याची माहिती खगोलशास्त्रज्ञांना मिळाली होती. त्यावेळी त्याचा वेग ९२ हजार किमी प्रतितास एवढा होता. तसेच तो खूप वेगाने सौममालेमध्ये आला होता. तसेच सूर्याच्या अगदी जवळून निघून गेला होता.

मात्र हा Oumuamua कुठल्या वस्तूपासून बनलेला होता. हे तज्ज्ञांना समजू शकलेले नाही. दरम्यान, मार्च महिन्यामध्ये अमेरिकेच्या अॅरिझोना स्टेट विद्यापीठामधील शास्त्रज्ञ अॅलन जॅक्सन आणि स्टिव्ह डेस्च यांनी दावा केला की, त्यांनी याचा शोध घेतला आहे. त्यांनी सांगितले की, हा एक नायट्रोजन आइसबर्ग होता. तो आमच्या सोलर सिस्टिमच्या बाहेरील प्लुटोसारख्या ग्रहामधून निघाला होता.

मात्र तज्ज्ञांच्या या दाव्याबाबत अनेकांनी असहमती व्यक्त केली आहे. हावर्ड विद्यापीठाचे भौतिकशास्त्रज्ञ आमीर सिराज यांनी सांगितले की, मी ज्यावेळी या शोधपत्रांना पाहिले होते. तेव्हाच मला समजले होते की, असे कुठलेही शारीरिक तंत्र नाही आहे. ज्यामाध्यमातून हे काम करता येईल. त्यांच्या मते आईसबर्गबाबत करण्यात आलेला दावा सध्यातरी योग्य वाटत नाही आहे. त्यांनी सांगितले की, अंतराळात एवढा नायट्रोजन नाही आहे ज्यामधून Oumuamua तयार होईल. हा Oumuamua १३०० पासून २६०० फुटांपर्यंत लांब होता. तसेच तो ११५ ते ५४८ फूट रुंद होता. त्यांनी सांगितले की, शुद्ध नायट्रोजन अंतराळामध्ये दुर्मीळ आहे.  

Web Title: The mysterious object that passed close to the earth, which had been a mystery for many days, now made a big claim by Howard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.