Vladimir Putin Briefcase: पुतीन यांच्यासोबत रहस्यमयी सूटकेस! एका क्षणात सारे जग उद्ध्वस्त करण्याची क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 04:09 PM2022-02-19T16:09:34+5:302022-02-19T16:14:20+5:30

Russia Ukraine War: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्‍लादिमीर पुतिन हे या अण्वस्त्रांच्या युद्धाभ्यासावेळी हजर राहणार आहेत. याचवेळी ही सूटकेसही त्याच्यासोबत असणार आहे.

Mysterious suitcase with Vladimir Putin amid Ukraine Conflicts! Ability to destroy the whole world, more than 6000 nuclear weapons' connected | Vladimir Putin Briefcase: पुतीन यांच्यासोबत रहस्यमयी सूटकेस! एका क्षणात सारे जग उद्ध्वस्त करण्याची क्षमता

Vladimir Putin Briefcase: पुतीन यांच्यासोबत रहस्यमयी सूटकेस! एका क्षणात सारे जग उद्ध्वस्त करण्याची क्षमता

googlenewsNext

मॉस्को : युक्रेनसोबत सुरु असलेल्या युद्धाच्या वातावरणामुळे सध्या अणुयुद्धाचा धोका जगावर निर्माण झाला आहे. अमेरिकेने युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये १०० हून अधिक अणुबॉम्ब आणल्याचे वृत्त धडकल्यानंतर लगेचच रशियाने अण्वस्त्रांचा युद्धसराव सुरु केल्याचे वृत्त आले आहे. त्यातच पुतीन यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकांकडे एक ब्रिफकेस दिसत आहे, जर दगाफटका झाला तर याच ब्रिफकेसचा वापर करून जगावर हल्ले होऊ शकतात. 

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्‍लादिमीर पुतिन हे या अण्वस्त्रांच्या युद्धाभ्यासावेळी हजर राहणार आहेत. याचवेळी ही सूटकेसही त्याच्यासोबत असणार आहे. ही सुटकेस जगात तिसरे विश्वयुद्ध सुरु करण्याची ताकद ठेवते. रशियाकडे जगातील सर्वात जास्त म्हणजेच 6257 अणुबॉम्ब आहेत. एवढे अणुबॉम्ब जगाला कित्येक वेळा नष्ट करू शकतात. याच सुटकेसमध्ये या अणुब़ॉम्बना अॅक्टिव्ह करण्याची क्षमता आहे.

 दिसायला सामान्य सुटकेससारखीच ही ब्रिफकेस आहे. परंतू २०१९ मध्ये पहिल्यांदा याची झलक जगाने पाहिली होती. या ब्रिफकेसमध्ये लाल आणि पांढऱ्या रंगाची दोन बटने आहेत, जी रशियन लष्कराला अण्वस्त्र हल्ल्यांचे आदेश देऊ शकतात. 

रशियन मीडियानुसार, ही सूटकेस केवळ एका कोडद्वारे उघडली जाऊ शकते. एवढेच नाही तर २४ तास कडक सुरक्षा कवचाखाली असते. याद्वारे रशियाचे 6 हजारांहून अधिक अणुबॉम्ब नियंत्रित केले जातात. पुतिन कुठेही गेले तरी सुरक्षा अधिकारी ही सुटकेस नेहमी सोबत घेऊन जातो. अण्वस्त्र हल्ला झाल्यास पुतीन यांना मदत करण्यासाठी प्रशिक्षित असलेला हा अधिकारी एकमेव आहे. रशियन भाषेत, या ब्रीफकेसला चेगेट म्हणतात, ज्याचे नाव डोंगराच्या नावावर आहे.

ही सुटकेस 1980 च्या सुमारास विकसित करण्यात आली होती. पुतिनसोबत फक्त एक सूटकेस दिसत आहे पण त्याची एकूण संख्या 3 आहे. या तिन्ही सूटकेस फक्त उच्च रशियन अधिकारी उघडू शकतात. या अधिकार्‍यांमध्ये रशियाचे संरक्षण मंत्री, सशस्त्र दलाचे चीफ ऑफ द जनरल स्टाफ यांचा समावेश असल्याचे मानले जाते. विश्लेषकांचे म्हणणे आहे की या सूटकेसमध्ये लाल आणि पांढरे अशी बटणे आहेत, परंतु पांढर्‍या बटणाने हल्ला करण्याचा आदेश दिला जातो.

Web Title: Mysterious suitcase with Vladimir Putin amid Ukraine Conflicts! Ability to destroy the whole world, more than 6000 nuclear weapons' connected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.