जबरदस्त Video! मंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा वावर; नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 08:19 AM2021-05-08T08:19:19+5:302021-05-08T08:25:43+5:30
New Sounds From Mars: नासाने शुक्रवारी ही घटना जाहीर केली आहे. हे फुटेज नासाच्या सहा चाकी रोव्हरने टिपले आहे. ३० एप्रिलला या रोव्हरने हा आवाज रेकॉर्ड केला होता.
वॉशिंग्टन : अमेरिकेची स्पेस एजन्सी नासाने (NASA) हेलिकॉप्टरचे मंगळावरील (Mars) आतापर्यंतची सर्वात यशस्वी उड्डाण केले आहे. हेलिकॉप्टर Ingenuity ने आपली पाचवी फ्लाईटच नाही तर एक वन वे ट्रिपदेखील पूर्ण केली आहे. Perseverance Rover पासून वेगळे होऊन Jezero Crater च्या Wright Brothers Fields मध्ये फ्लाईट टेस्ट करणाऱ्या हेलिकॉप्टरने दक्षिणेकडे 129 मीटर दूर उड्डाण केले. या उड्डाणावेळच्या रोटर ब्लेडचा आवाजही ऐकायला आला आहे. (NASA's rover has first time captured the low-pitched whirring of the Ingenuity helicopter's blades sound on Mars.)
नासाने शुक्रवारी ही घटना जाहीर केली आहे. हे फुटेज नासाच्या सहा चाकी रोव्हरने टिपले आहे. ३० एप्रिलला या रोव्हरने हा आवाज रेकॉर्ड केला होता.
तीन मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये की आणि दबक्या आवाजात हेलिकॉप्टरची ब्ले़ड जशी आवाज करतात तसा आवाज येत आहे. जेझेरो क्रेटरवर बेल्ड फिरल्याने वाऱ्याचा आवाज होत आहे. ही ब्लेड 2,400 rpm या वेगाने फिरत आहेत. तसेच या आवाजाची उंची 872 फूटांवर आहे.
🔊🔴 New sounds from Mars: Our @NASAPersevere rover caught the beats coming from our Ingenuity #MarsHelicopter! This marks the first time a spacecraft on another planet has recorded the sounds of a separate spacecraft.
— NASA (@NASA) May 7, 2021
🎧🚁 Turn the volume up: https://t.co/o7zG6mQJzxpic.twitter.com/s8Hm3dhcgg
पाचव्या उड्डणावेळी एअरफिल्डवर जाऊन हेलिकॉप्टरने 10 मीटरची उंची घेतली. लँड होण्याआधी या हेलिकॉप्टरने हाय रिझोल्यूशन फोटोदेखील घेतले. Ingenuity च्या मदतीने रोटरक्राफ्ट टेक्नॉलॉजीची चाचणी आता परग्रहावरही केली गेली आहे. आता ही चाचणी एका नवीन फेजमध्ये गेली आहे.
हे हेलिप्टर लाल ग्रहाची पाहणी करेल. यावेळी ते अशा जागी जाऊन पोहोचेल जिथे भविष्यात अंतराळवीरांचे जाणे कठीण असेल. तसेच उपग्रहांच्या दुर्बिनींपासून या जागा लांब असतील. पाचवे उड्डाण हे 108 सेकंदांचे होते. गेल्या उड्डाणापेक्षा यावेळची जागा सपाट आणि कोणतीही अडथळा नसलेली होती.
रोव्हरवर सुपरकॅम नावाचे डिव्हाईस लावलेले आहे. यामध्ये असे सेन्सर आहेत, जे रोव्हरसमोरील आलेल्या दगडांचा अभ्यास करतात. यामध्ये पाण्याचा अंश आहे का किंवा त्यामध्ये कोणकोणती रसायन आहेत याची माहिती देतात. याच सुपरकॅममध्ये उच्च क्षमतेचा मायक्रोफोन आहे. तो हे दगड किंवा पृष्ठभाग किती कठीण आहे हे रेकॉर्ड करतो. यामुळे या मायक्रोफोनने जे रेकॉर्ड केले आहे ते आमच्यासाठी एकप्रकरचा सुवर्ण क्षण असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.