Naegleria Fowleri Virus: मेंदू खाणारा 'व्हायरस', या देशात पहिल्या रुग्णाचा मृत्यू; जाणून घ्या किती घातक आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 04:19 PM2022-12-27T16:19:00+5:302022-12-27T17:38:27+5:30

Naegleria Fowleri Virus: गेल्या तीन वर्षांपासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यातच एका नवीन व्हायरसची माहिती समोर आली आहे.

Naegleria Fowleri Virus: Brain-eating 'virus', first patient dies in country; Know how dangerous... | Naegleria Fowleri Virus: मेंदू खाणारा 'व्हायरस', या देशात पहिल्या रुग्णाचा मृत्यू; जाणून घ्या किती घातक आहे...

Naegleria Fowleri Virus: मेंदू खाणारा 'व्हायरस', या देशात पहिल्या रुग्णाचा मृत्यू; जाणून घ्या किती घातक आहे...

googlenewsNext

Brain Eating Virus: गेल्या तीन वर्षांपासून जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. चीनमध्ये दररोज लाखो लोकांना संसर्ग होत आहे, तर शेकडो लोकांचा मृत्यू होत आहे. यादरम्यान एक नवीन बातमी ऐकायला मिळत आहे, ज्यावर विश्वास ठेवणेही कठीण आहे. कोरियामध्ये एका व्यक्तीच्या शरीरात मेंदू खाणारा व्हायरस आढळला आहे.

दक्षिण कोरिया टाईम्सच्या म्हणण्यानुसार, थायलंडहून परतलेल्या 50 वर्षीय व्यक्तीचा 'ब्रेन इटिंग अमिबा' म्हणून ओळखल्या जाणार्‍या नेग्लेरिया फॉउलरीच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, दोन आठवड्यांपूर्वी 10 डिसेंबर रोजी कोरियाला परतण्यापूर्वी या व्यक्तीने थायलंडमध्ये एकूण चार महिने घालवले होते. संध्याकाळी जेव्हा रुग्ण परत आला, तेव्हा त्याला डोकेदुखी, ताप, उलट्या, बोलण्यात अडचण आणि मान ताठ अशी लक्षणे आढळली.

दुसऱ्या दिवशी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 21 डिसेंबर रोजी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. कोरियन हेल्थ एजन्सीच्या म्हणण्यानुसार, त्याच्या मृत्यूचे कारण नेग्लेरिया फॉउलरी आहे. दक्षिण कोरियामध्ये हा रोगाचा पहिला ज्ञात रुग्ण आहे. KDCA ने अद्याप संक्रमण कशामुळे झाले, हे सांगितले नाही. पण, विषाणूचे दोन मुख्य स्त्रोत दूषित पाण्यात पोहणे आणि संक्रमित पाण्याने नाक धुणे हे सांगितले जात आहे. Naegleria fowleri चे पहिले प्रकरण 1937 मध्ये व्हर्जिनिया, युनायटेड स्टेट्स येथे नोंदवले गेले होते.

याला 'ब्रेन इटिंग अमिबा' म्हणतात
युनायटेड स्टेट्स नॅशनल पब्लिक हेल्थ एजन्सी सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मते, नेग्लेरिया फॉवलेरी हा एक अमिबा (एक पेशी असलेला सजीव) आहे. हा तलाव, नद्या आणि गरम पाण्याचे झरे यांसारख्या पाण्यात राहतो. याला 'ब्रेन इटिंग अमिबा' असे म्हणतात. हा अमिबा नाकावाटे मेंदूपर्यंत जातो. युनायटेड स्टेट्समध्ये दरवर्षी तीन लोकांना याचा संसर्ग होतो. हे संक्रमण प्राणघातक आहे.

Web Title: Naegleria Fowleri Virus: Brain-eating 'virus', first patient dies in country; Know how dangerous...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.