Naftali Bennett Corona Positive: भारत दौऱ्याआधीच इस्त्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 11:39 AM2022-03-28T11:39:59+5:302022-03-28T11:40:42+5:30
बेनेट यांनी काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांची भेट घेतली होती. आता बेनेट यांना कोरोनाची लागण झाल्याचे इस्त्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
इस्त्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट हे तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. परंतू त्या आधीच त्यांना कोरोनाची लागण झाल्याने हा दौरा अडचणीत सापडला आहे.
बेनेट यांनी काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांची भेट घेतली होती. आता बेनेट यांना कोरोनाची लागण झाल्याचे इस्त्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बेनेट यांना पाच दिवसांनी भारत दौऱ्यावर यायचे आहे. यामुळे हा दौरा रद्द होण्याची शक्यता आहे.
बेनेट हे पहिल्यांदाचा भारत दौऱ्यावर येत आहेत. ३ एप्रिल ते ५ एप्रिलपर्यंत ते भारतात येणार आहेत. इस्त्रायलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मित्राचा पराभव करत ते सत्तेत आले होते. इस्त्रायलमध्ये चौथ्या बुस्टर डोसचीही सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या लाटेनंतर लसीकरण मोठ्याप्रमाणावर करून जगातील पहिला मास्क फ्री देश बनला होता.
नफ्तालींच्या कार्यालयाकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. इस्त्रायलचे पंतप्रधानांची प्रकृती उत्तम आहे. ते त्यांचे काम सुरु ठेवतील. मात्र, त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. ते घरूनच काम पाहत आहेत, असे म्हटले आहे.