अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीस आता नग्न पुतळ्यांचा कलंक!

By admin | Published: October 20, 2016 04:44 AM2016-10-20T04:44:18+5:302016-10-20T04:44:18+5:30

सार्वजनिक ठिकाणी उमेदवारांचे नग्न पुतळे अवतरू लागल्याने असभ्यतेचा निचांक गाठला गेला आहे.

Naked statues stain the US presidential election! | अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीस आता नग्न पुतळ्यांचा कलंक!

अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीस आता नग्न पुतळ्यांचा कलंक!

Next


न्यूयॉर्क : जेमतेम १० दिवसांवर येऊन ठेपलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचाराचे वातावरण दोन्ही उमेदवारांनी चालविलेल्या परस्परांच्या चारित्र्यहननाने आधीच गढूळ झालेले असताना सार्वजनिक ठिकाणी उमेदवारांचे नग्न पुतळे अवतरू लागल्याने असभ्यतेचा निचांक गाठला गेला आहे.
न्यू यॉर्क शहराच्या मॅनहटन भागातील भुयारी रेल्वेच्या एका स्टेशनवर मंगळवारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा कागदाचा लगदा भरून तयार केलेला भलामोठा ‘टॉपलेस’ पुतळा कोणीतरी आणून ठेवल्याने वातावरण तापले.
‘न्यू यॉर्क डेली न्यूज’च्या एका वार्ताहराने टिपलेला एक व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये ‘व्हायरल’ झाला. एक महिला हिलरींचा हा पुतळा ओढून बाजूला नेत असताना आणि पुन्हा त्यास कोणी आधार देऊन उभे करू नये यासाठी त्यावर बराच वेळ बसून राहिल्याचेही त्या व्हिडिओत दिसत होते. ‘महिलांच्या बाबतीत असे करावे, हे म्हणजे फारच झाले,’ असे एक प्रवासी स्त्री बाजूने जाताना संतापाने म्हणाल्याचेही त्या व्हिडिओत ऐकू आले.
अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचाराला विखारी स्वरूप आल्यापासून असा अभद्र प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे. याआधी मॅनहटनच्याच एका सबबे स्टेशनवर रिपब्लिकन पक्षाचे आक्रस्ताळे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा असाच एक पूर्णपणे नग्नावस्थेतील पूर्णाकृती पुतळा प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र आता हिलरींचा असा पुतळा पाहून नागरिकांमध्ये दिसून आलेल्या भावना ट्रम्प यांच्या पुतळ््याच्या वेळी व्यक्त झाल्या त्याहून पूर्णपणे वेगळ््या होत्या. हिलरींच्या पुतळ््यावरून संताप व्यक्त झाला व तो लोकांच्या नजरेतून झटपट हलविण्यासाठी धावपळ दिसली. याउलट, ट्रम्प यांच्या पुतळयापाशी थांबून लोक फोटो काढताना व सेल्फी घेतानाही दिसले होते. एवढेच नव्हे तर, ट्रम्प यांच्या नग्न पुतळ््याची स्पष्टपणे दिसणारी गुप्तांगे झाकण्याचे सौजन्यही कोणी दाखविले नव्हते!
े२१ सप्टेंबर रोजी लास व्हेगास शहरातील एका चौकातही ट्रम्प यांचा असाच एक अवाढव्य नग्न पुतळा कोणीतरी आणून उभा केला होता. लोकांनी त्याच्यासमोर उभे राहून टिंगल-टवाळी केल्यानंतर रात्री त्या पुतळ््यावर स्प्रेने चित्रकारी करण्यात आली होती व दोन दिवसांनी तो पुतळा स्थानिक प्रशासनाने तेथून हलविला होता. हिलरी क्लिंटन यांचा हा पुतळा सबवे स्टेशनच्या रस्त्यात कोणी आणून ठेवला, हे लगेच स्पष्ट झाले नाही. ट्रम्प यांचा पुतळा प्रदर्शित करण्याचा उपद््व्याप ‘इंडेक्लाइन’ नावाच्या कार्यकर्त्यांच्या समूहाने केला होता.
मात्र आता हिलरी क्लिंटन यांच्या पुतळ््याशी आमचा काही संबंध
नाही, असे त्यांनी एक पत्रक काढून स्पष्ट केले. क्लिंटन यांचे समर्थक असलेले मेयर बिल डी ब्लेसिओ
यांच्या प्रवक्त्याने या पुतळे
प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. (वृत्तसंस्था)
>कारवाईत दिसला फरक
या दोन्ही पुतळ्यांच्या बाबतीत स्थानिक पोलीस आणि नागरी प्रशासनाने केलेल्या कारवाईत फरक दिसून आला.क्लिंटन यांचा अर्धनग्न पुतळा पोलिसांनी हलविला नाही. ज्याने कोणी तो पुतळा आणळा होता त्यानेच तेथून तो उचलून नेला व आम्ही या संदर्भात कोणालाहा समन्स काढलेले नाही किंवा चलन फाडलेले नाही, असे पोलीस प्रवक्ता म्हणाला.—ट्रम्प यांचा पुतळा मात्र स्थानिक प्रशासनाच्या उद्यान आणि बगिचे विभागाने उचलून नेला होता व तो परवानगी न घेता प्रदर्शित केला म्हणून हलविला गेला, असे मजेशीर कारणही त्यावेळी दिले होते.

Web Title: Naked statues stain the US presidential election!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.