लंडन हल्ल्यातील दहशतवाद्यांची नावे उघड
By admin | Published: June 6, 2017 12:08 AM2017-06-06T00:08:09+5:302017-06-06T00:08:09+5:30
लंडनमध्ये काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभाग असलेल्या दहशतवाद्यांची नावे पोलिसांनी जाहीर केली आहेत. यातील एका दहशतवाद्याचे
Next
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 5 - लंडनमध्ये काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभाग असलेल्या दहशतवाद्यांची नावे पोलिसांनी जाहीर केली आहेत. यातील एका दहशतवाद्याचे नाव खुर्रम बट्ट (27) असून, विवाहित असलेला खुर्रम अनेक वर्षांपासून पूर्व लंडनमध्ये राहत आहे. तर दुसऱ्या हल्लेखोराचे नाव रशिद रिदवान (30) आहे. यातील खुर्रमचा जन्म पाकिस्तानमध्ये झालेला असून, तो ब्रिटिश नागरिक आहे. तर रशिदचा संबंध मोरोक्को लिबियाशी आहे.
ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये गजबजलेल्या बाजारपेठेत लंडन ब्रिजवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 8 जण ठार तर 48 जण जखमी झाले होते. हातात चाकू आणि नकली आत्मघातकी जॅकेट परिधान करून हे अतिरेकी आले होते. 8 जून रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी तीनही हल्लेखोरांना गोळ्या घालून ठार मारले.
हा हल्ला शनिवारी रात्री स्थानिक वेळेनुसार, दहाच्या सुमारास झाला. या हल्लेखोरांनी एक व्हॅन लंडन ब्रिजवर गर्दीत घुसवली. जवळच्याच बाजारपेठेत त्यांनी नागरिकांवर चाकूने हल्ला केला. प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, हे तीन जण व्हॅनमधून आले होते आणि ‘हे अल्लाहसाठी आहे’ असे ते म्हणत होते. पोलिसांनी सांगितले की, जखमी 48 नागरिकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हा हल्ला आठ मिनिटे सुरू होता. ज्या भागात बार, रेस्टॉरंट, क्लब आहेत त्याच भागात हा हल्ला झाला.