भयंकर...! हा देश 70 हत्ती, 300 झेब्रे अन् घोड्यांसह 700 जानवरं मारणार, ओढवलीय भीषण परिस्थिती? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 12:32 PM2024-09-01T12:32:55+5:302024-09-01T12:33:23+5:30

...यामुळे, आता नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी येथील सरकारने काही प्राणी मारण्याचा निर्णय घेतला आहे.

namibia facing drought will kill 700 animals including 70 elephants, 300 zebras for meat | भयंकर...! हा देश 70 हत्ती, 300 झेब्रे अन् घोड्यांसह 700 जानवरं मारणार, ओढवलीय भीषण परिस्थिती? 

भयंकर...! हा देश 70 हत्ती, 300 झेब्रे अन् घोड्यांसह 700 जानवरं मारणार, ओढवलीय भीषण परिस्थिती? 


दक्षिण आफ्रिकन देश नामिबिया सध्या गेल्या 100 वर्षांच्या इतिहासातील सर्वात भीषण दुष्काळाचा सामना करत आहे. यामुळे येथील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. येथील नागरिकांना दोन वेळचे अन्न मिळणेही अवघड झाले आहे. पिण्याच्या पाण्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारी धान्याची गोदामेही रिकामी झाली आहेत. कुठून तरी मदत मिळेल, अशी आशाही नाही, अशा संपूर्ण परिस्थितीमुळे सरकारही हतबल दिसत आहे. यामुळे, आता नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी येथील सरकारने काही प्राणी मारण्याचा निर्णय घेतला आहे.

आता नामिबिया सरकारने लोकांची भूक भागविण्यासाठी हत्ती आणि पाणघोड्यांसह 700 हून अधिक वन्य प्राण्यांना मारण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात, देशाचे म्हणणे आहे की, ते या प्राण्यांपासून मिळणारे मांस नागरिकांमध्ये वितरित करणार आहेत. याचे मुख्य कारण नामिबियातील अन्न संकट आहे.

न्यूयॉर्क टाइम्समध्ये दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिकेतील बहुतांश भाग दुष्काळाने त्रस्त आहेत. संपूर्ण प्रदेशात 30 दशलक्षाहून अधिक लोक प्रभावित झाले असल्याचे युनायटेड नेशन्स वर्ल्ड फूड प्रोग्रामने जूनमध्ये म्हटले होते.

हे प्राणी मारले जाणार - 
हत्तींशिवाय, 300 झेब्रा, 30 पाणघोडे, 50 इम्पाला, 60 म्हशी, 100 ब्लू वाइल्डबीस्ट आणि 100 एलँड मारण्याची देशाची योजना आहे. तसेच, नामिबियातील 84 टक्के अन्न संसाधने आधीच संपली आहेत, असे संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्यांनी गेल्या आठवड्यातच म्हटले होते.

56,800 किलो मांस सरकारला मिळालं -
नामिबियाच्या पर्यावरण, वनीकरण आणि पर्यटन मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, हे प्राणी राष्ट्रीय उद्याने आणि असा भागातून येतील जेथे त्यांची संख्या अधिक आहे. या प्राण्यांना व्यावसायिक शिकाऱ्यांकडून मारले जाईल. काही कंपन्यांना कंत्राटही देण्यात आली आहेत. आतापर्यंत 157 प्राण्यांची शिकार करण्यात आली असून यातून सरकारला 56,800 किलोपेक्षा अधिक मांस मिळाले आहे. हे मांस लोकांमध्ये वितरित केले जात आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, नैऋत्य आफ्रिकन देशांतील दुष्काळाचा परिणाम कमी करणए हा या कार्यक्रमाचा उद्दिष्ट आहे.
 

Web Title: namibia facing drought will kill 700 animals including 70 elephants, 300 zebras for meat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.