जोहान्सबर्गमध्ये नमो नमो !
By admin | Published: July 9, 2016 12:15 AM2016-07-09T00:15:14+5:302016-07-09T00:35:10+5:30
अफ्रिकन देशांच्या दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जोहान्सबर्ग येथील भारतीय नागरिकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सर्वांचे आभार मानत
Next
ऑनलाइन लोकमत
जोहान्सबर्ग, दि. ९ - अफ्रिकन देशांच्या दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जोहान्सबर्ग येथील भारतीय नागरिकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सर्वांचे आभार मानत त्यांनी मी सर्व भारतीयांच्या स्वप्नांना सोबत घेऊन आल्याचे सांगितले. तसेच, दक्षिण अफ्रिकामध्ये आल्यावर मला खूप आनंद झाल्याचे स्पष्ट केले. उपस्थित नागरिकांनी नरेंद्र मोदींच्या नावाचा जयघोष केला होता. या कार्यक्रमादरम्यान, नरेंद्र मोदींनी नेल्सन मंडेला यांच्यासारखा शर्ट परिधान केला होता.
नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील काही मुद्दे -
- दक्षिण अफ्रिकातील नागरिकांसाठी ई-व्हिसा चालू करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना आता घर बसल्या व्हिसा काढता येणार आहे.
- दक्षिण अफ्रिकेच्या गरजा भारत पूर्ण करु शकतो.
- उद्योग आणि व्यापारांमध्ये तेजी आणण्यावर भर देत आहोत.
- आम्ही भारतातील सव्वा कोटी लोकांच्या जीवनात बदल करण्यासाठी काम करत आहोत
- दोन्ही देशांच्या अपेक्षा आणि लढा एक आहे. दक्षिण अफ्रिका भारताला अपेक्षा पूर्ण करण्यास सहयोग करेल.
- आम्ही स्टेट ऑफ आर्ट इंफ्रास्ट्रक्चर घेऊन येण्याच्या मार्गावर आहोत.
- येत्या काही दिवसांत विकास दर आठ टक्कापर्यंत येण्यावर आमचे लक्ष्य केंद्रीत असेल.
- महत्वकांक्षी कामे करणा-या भारतीयांवर गर्व आहे.
- महात्मा गांधी म्हणत होती, या भूमीवर त्यांचा नवीन जन्म झाला आहे.
- सत्याग्रहाची सुरुवात महात्मा गांधी यांनी या भूमीतूनच केली.
- दक्षिण अफ्रिकेनेच मोहनदास यांना महात्मा बनविले.
- आपले पुर्वज दु:ख झेलून पुढे गेले. दक्षिण अफ्रिका पवित्र भूमी आहे.
- दक्षिण अफ्रिकेला जवळ करणारा पहिला देश भारत.
- होळी, पोंगल दक्षिण अफ्रिकेची संस्कृती दर्शवितात.
- हिंदी, तमीळ, गुजराती, उर्दू आणि तेलगू लोकांनी दक्षिण अफ्रिकन समाजाला समृद्ध केले.
- १० जुलै १९९१ मध्ये अफ्रिकेच्या क्रिकेट संघावर बंदी उठविण्यात आली होती. पहिल्यांदा अफ्रिकेचा संघ भारतात खेळला होता.
- मी सव्वा कोटी भारतीयांकडून मैत्रीचा संदेश घेऊन आलो आहे.
- द.अफ्रिकामध्ये आल्यावर मला खूप आनंद झाला आहे. मी भारतीयांच्या स्वप्नांच्या सोबत आलो आहे. मी आपला सर्वांचा आभारी आहे.