चीनमध्ये प्रथमच नानजिंग स्मृतीदिन
By admin | Published: December 14, 2014 01:37 AM2014-12-14T01:37:17+5:302014-12-14T01:37:17+5:30
नानजिंग हत्याकांडाची आठवण ठेवणो हे प्रदीर्घ द्वेष कायम ठेवण्यासाठी नसून शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी आहे, असे म्हटले.
Next
बीजिंग : एखादा गुन्हा नाकारण्याचा अर्थ पुन्हा तो घडू शकतो, असे गर्भित विधान करताना चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी नानजिंग हत्याकांडाची आठवण ठेवणो हे प्रदीर्घ द्वेष कायम ठेवण्यासाठी नसून शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी आहे, असे म्हटले.
दुस:या महायुद्धात 13 डिसेंबर 1937 रोजी जपानने चीनवर आक्रमण केले होते. नानजिंग शहर ताब्यात घेतल्यावर चीनचे जवळपास तीन लाख नागरिक ठार मारले गेले होते. 1937 ते 1945 या दोन देशांत पूर्ण युद्ध झाले व जपानचा पराभव होऊन दुसरे महायुद्ध संपले.
या हत्याकांडाच्या स्मरणार्थ शनिवारी चीनमध्ये प्रथमच कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी शिनपिंग बोलत होते. त्या हत्याकांडातून वाचलेले व वयाची 9क् वर्षे पूर्ण केलेल्यांसह सुमारे 1क् हजार नागरिक उपस्थित होते. चीन आणि जपानमध्ये गेल्या काही वर्षात तणावाचे संबंध आहेत तरीही गेल्या महिन्यात या दोन देशांच्या प्रमुखांची भेट झाल्यानंतर त्या संबंधात काहीशी सुधारणा झाली आहे. जपानी लष्कराच्या काही लोकांनी हे हत्याकांड केले असले तरी संपूर्ण जपानबद्दल चीनने द्वेषभावना बाळगायचे कारण नाही, असेही शी शिनपिंग म्हणाले. (वृत्तसंस्था)
4चीनमध्ये हत्याकांडाचे वर्णन नानजिंगवरील बलात्कार (रेप ऑफ नानजिंग) या शब्दांत केले जाते. जपानी लष्कराने सहा आठवडे धुमाकूळ घातला होता.
4जपान सैनिकांनी मोठा विध्वंस घडवून आणला होता. त्यात 2क् हजार महिलांवर बलात्कार झाले, नंतर त्या मरण पावल्या. जपानने मोठय़ा प्रमाणावर सैनिकेतरांची हत्या, लुटालूट व अन्य कृत्ये घडल्याचे मान्य केले असले तरी मृतांची नेमकी संख्या निश्चित करणो अवघड असल्याचे म्हटले.