भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 02:30 PM2024-09-22T14:30:09+5:302024-09-22T14:34:20+5:30

Narendra Modi America Visit :गेल्या वर्षी संरक्षण मंत्रालयाने या खरेदीस मान्यता दिली होती.

Narendra Modi America Visit : India will get 31 killer drones from America; Deal done between Narendra Modi and Joe Biden | भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'

भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'

Narendra Modi America Visit :भारत आणि अमेरिकतेली संरक्षण व्यापारात सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, आता भारत अमेरिकेकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज 31 MQ-9B (16 स्काय गार्डियन आणि 15 सी गार्डियन) रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट ड्रोन/किलर ड्रोन खरेदी करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे. या ड्रोनची किंमत सुमारे 3 अब्ज डॉलर्स आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय संरक्षण मंत्रालयाने गेल्या वर्षी जूनमध्ये अमेरिकेकडून हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज MQ-9B स्काय गार्डियन आणि सी गार्डियन सशस्त्र ड्रोन आणि लेझर-गाइडेड बॉम्ब खरेदी करण्यास मंजुरी दिली होती. दरम्यान, आजच्या भेटीत मोदी आणि बायडेन यांनी भारत-अमेरिका संरक्षण सहकार्य रोडमॅपचे कौतुक केले. या रोडमॅप अंतर्गत, जेट इंजिन, दारुगोळा आणि ग्राउंड मोबिलिटी सिस्टीम यांसारखी अवजड उपकरणे आणि शस्त्रे तयार केली जाणार आहेत. 

भारत अमेरिकेचा सर्वात मोठा भागीदार 
क्वाड कॉन्फरन्सनंतर दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिका भागीदारी अतिशय मजबूत असल्याचे वर्णन केले. याशिवाय, परस्पर हितसंबंधांच्या क्षेत्रात द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ करण्याचे मार्ग, इंडो-पॅसिफिक क्षेत्रासह जागतिक आणि प्रादेशिक समस्या, रशिया-युक्रेन युद्ध आणि मोदींच्या नुकत्याच झालेल्या युक्रेन दौऱ्यावरही द्विपक्षीय बैठकीत चर्चा झाली.

बैठकीत दोन्ही नेत्यांनी यूएस-इंडिया सीईओ फोरमचे सह-अध्यक्ष असलेल्या लॉकहीड मार्टिन आणि टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड या दोन कंपन्यांमधील C-130J सुपर हरक्यूलस विमानावरील टीमिंग कराराचे कौतुक केले. C-130 सुपर हर्क्युलस विमाने चालवणाऱ्या भारतीय ताफ्याच्या आणि जागतिक भागीदारांच्या तयारीला पाठिंबा देण्यासाठी हा करार भारतात देखभाल, दुरुस्ती आणि सुविधा स्थापन करेल. अमेरिका-भारत संरक्षण आणि एरोस्पेस सहकार्यातील हे महत्त्वाचे पाऊल आहे. 

'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...

Web Title: Narendra Modi America Visit : India will get 31 killer drones from America; Deal done between Narendra Modi and Joe Biden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.