Narendra Modi birthday : पाकिस्तानच्या मंत्र्यांनी मर्यादा ओलांडली, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केले आक्षेपार्ह ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 01:49 PM2019-09-17T13:49:54+5:302019-09-17T13:53:51+5:30
केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्यापासून पाकिस्तानी नेते सैरभैर झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून गेल्या महिनाभरापासून भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका सुरू आहे.
इस्लामाबाद - केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्यापासून पाकिस्तानी नेते सैरभैर झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून गेल्या महिनाभरापासून भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका सुरू आहे. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त जगभरातून शुभेच्छा मिळत आहेत. मात्र आजच्या दिवशीही शिष्टाचार न पाळता पाकिस्तानचे मंत्री फवाद हुसेन यांनी मर्यादा ओलांडून मोदींवर अत्यंत आक्षेपार्ह ट्विट केले आहे. दरम्यान, फवाद हुसेन यांच्या ट्विटवर सगळीकडून टीका होत आहे.
पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री फवाद हुसेन यांनी #Modibirthday या हॅशटॅगसह एक ट्विट केले आहे. आजचा दिवस आपल्याला गर्भनिरोधकांचे महत्त्व समजावतो, असा अत्यंत आक्षेपार्ह उल्लेख त्यांनी या ट्विटमधून केला आहे.
Today reminds us the importance of contraceptives #ModiBirthday
— Ch Fawad Hussain (@fawadchaudhry) September 17, 2019
दरम्यान, फवाद हुसेन यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. अगदी पाकिस्तानमधूनही नेटिझन्स त्यांना खडेबोल सुनावत आहेत. मंत्रिपदावर बसलेला पाकिस्तानस सरकारचा प्रतिनिधी एका स्वतंत्र देशाच्या पंतप्रधानाबाबत असे वक्तव्य करत आहेत. एवढेच शत्रुत्व दाखवायचे असेल तर तंत्रज्ञान, लोकशाहीमध्ये स्पर्धा करा. वाईटसाइट बोलण्यात स्पर्धा करून जिंकणे काही सन्माननीय नाही, असा टोला आएशा अहमद नामक ट्विटर युझर्सने लगावला आहे.
चांद्रयानवरील ट्विटवरूनही झाले होते ट्रोल
भारताच्या विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्टभागावर क्रॅश लँडिंग झाल्यानंतरसुद्धा फवाद हुसेन यांनी भारताची खिल्ली उडवणारे ट्विट केले होते. त्यावरून त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते.