Narendra Modi : पाऊस पडत असतानाही मोदींच्या स्वागताला विमानतळावर भारतीयांची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 08:29 AM2021-09-23T08:29:58+5:302021-09-23T10:13:22+5:30
Narendra Modi : मोदींच्या स्वागतासाठी अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाचे बडे अधिकारी हजर होते. तर, अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजीतसिंह संधू हेही विमानतळावर हजर होते
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून वॉशिंग्टन विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या दौऱ्यात ते अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपपंतप्रधान व भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांचीही भेट घेणार आहेत. मोदींच्या स्वागतासाठी भारतीय नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे पडत्या पावसातही मोदींची वाट पाहात भारतीय नागरिक विमानतळाबाहेर आवर्जून हजर होते. अमेरिकेत दाखल होताच ते थेट पेंसिलवेनिया एवेन्यू येथील हॉटेल विलार्ड इंटरकॉन्टिनेंट येथे पोहोचले आहेत.
मोदींच्या स्वागतासाठी अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाचे बडे अधिकारी हजर होते. तर, अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजीतसिंह संधू हेही विमानतळावर हजर होते. त्यांसह, शेकडो भारतीय नागरिकही मायभूमीच्या पंतप्रधानांच्या स्वागताला उपस्थित होते. मोदींचे आगमन होताच, या नागरिकांनी मोदींचे नारे दिले. त्यानंतर, मोदींनी गाडीतून उतरुन भारतीय नागरिकांच्या जवळ जाऊन अभिवादन स्विकारले.
US: Prime Minister Narendra Modi arrives at the hotel in Washington DC
— ANI (@ANI) September 22, 2021
PM Modi is on a 3-day visit where he will be attending the first in-person Quad Leaders’ Summit, hold bilateral meetings, & address United Nations General Assembly pic.twitter.com/25OhBIyepw
जो बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरचा मोदी यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे. बायडेन राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर दोन्ही नेत्यांनी तीन वेळा ऑनलाइन चर्चा केली आहे. मात्र, पहिल्यांदाच त्यांची भेट होणार असून या भेटीत अफगाणिस्तान व तालिबान या विषयावर प्रामुख्याने चर्चा होईल.
पंतप्रधान मोदी वॉशिंग्टन डीसी आणि न्यूयॉर्क या शहरांना भेटी देणार आहेत. अफगाणिस्तानातील चिघळलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोदी यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. याआधी सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांनी अमेरिकेला भेट देऊन तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थित ‘हाऊडी मोदी’ हा कार्यक्रम केला होता. दरम्यान, या दौऱ्यात त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री, एनएसएसह एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील जात आहे.
US: Prime Minister Narendra Modi arrives at Joint Base Andrews, Washington DC for his 3-day visit.
— ANI (@ANI) September 22, 2021
He will be attending the first in-person Quad Leaders’ Summit, hold bilateral meetings, & address United Nations General Assembly pic.twitter.com/CzU3qabCVT
पंतप्रधान मोदी आणि बायडन यांच्यात 24 सप्टेंबर रोजी द्विपक्षीय बैठक होईल. या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि बायडन भारत-अमेरिकेतील संबंधांवर चर्चा करतील. तसेच या बैठकीत दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक संबंध मजबूत करणे, सुरक्षेसंबंधी तसेच स्वच्छ ऊर्जा भागिदारीला प्रोत्साहन देण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजीत डोभाल आणि विदेश सचिव श्रृंगला देखील असणार आहेत.