नरेंद्र मोदी-डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 11:18 PM2017-11-13T23:18:58+5:302017-11-13T23:19:08+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सोमवारी संरक्षण आणि सुरक्षेसह अनेक महत्वाच्या विषयांवर द्विपक्षीय चर्चा झाली.
मनिला : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सोमवारी संरक्षण आणि सुरक्षेसह अनेक महत्वाच्या विषयांवर द्विपक्षीय चर्चा झाली.
अशियायी देशांच्या शिखर परिषदेनिमित्त उभय नेते येथे आलेले आहेत. व्यूहरचनेच्यादृष्टिने अत्यंत महत्वाचा असलेला इंडो-पॅसिफीक विभाग खुला आणि समावेशक ठेवण्यासाठी भारत, अमेरिका, जपान आणि आॅस्ट्रेलियाच्या अधिकाºयांनी चर्चा केल्यानंतर मोदी-ट्रम्प यांच्यात चर्चा झाली. त्यांच्यात विभागातील सुरक्षेच्या परिस्थितीसह आपापसातील द्विपक्षीय व्यापाराला प्रोत्साहन देण्यासह इतर अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनच्या वाढत्या अरेरावीच्या पार्श्वभूमीवर या चार देशांची आघाडी स्थापन करण्याचा विचार झाला. व्यूहरचनेच्यादृष्टिने महत्वाच्या असलेल्या इंडो-पॅसिफीक विभागात भारताला मोठी भूमिका असल्याला अमेरिकेने पाठिंबा दिला आहे. ट्रम्प यांनी केलेल्या ‘इंडो-पॅसिफीक’ शब्दप्रयोगाने अमेरिका चीनच्या वाढत्या अरेरावीला शह देण्यासाठी भारत, अमेरिका, जपान व आॅस्ट्रेलियाची आघाडी पुन्हा जिवंत करण्याच्या प्रयत्नांत असल्याच्या चर्चांना तोंड फुटले.
ट्रम्प यांनी भारताने त्याच्या अर्थव्यवस्थेला मोकळे केल्यानंतर केलेल्या विस्मयकारक प्रगतीची आणि नरेंद्र मोदी यांची शनिवारी प्रशंसा केली होती. मोदी हे अवाढव्य भारत देश आणि त्याच्या लोकांना एक करण्यासाठी यशस्वीपणे काम करीत आहेत, असेही ते म्हणाले होते. एक अब्ज लोकसंख्येच्या भारतातील सार्वभौम आणि जगातील सगळ््यात मोठ्या लोकशाहीचेही त्यांनी कौतूक केले होते.