'आमचे यश संपूर्ण मानवतेचे यश', BRICS मध्ये पीएम मोदींनी केला चंद्रयान-3 चा उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 03:35 PM2023-08-24T15:35:31+5:302023-08-24T15:36:47+5:30
Brics Summit: 15 व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी PM नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेत आहेत.
PM Modi At Brics Summit: दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या ब्रिक्स संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झाले आहेत. आज संमेलनाच्या शेवटच्या दिवशी, पंतप्रधान मोदींनी चंद्रयानच्या यशाबद्दल भारताचे अभिनंदन करणाऱ्या राष्ट्रांचे आणि राष्ट्रप्रमुखांचे आभार मानले. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशाच्या यशाचे वर्णन मानवतेचे यश असे केले.
पीएम मोदी म्हणाले की, भारतासाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे. हे यश संपूर्ण मानवतेच्या यशाशी जोडले जात आहे. या ऐतिहासिक प्रसंगी भारतातील लोक आणि आपल्या शास्त्रज्ञांच्या वतीने मी जगातील इतर वैज्ञानिकांचे आणि शुभेच्छा देणारअया सर्व देशांचे आभार मानतो.
Speaking at the BRICS Summit. https://t.co/n93U4Vbher
— Narendra Modi (@narendramodi) August 24, 2023
ब्रिक्सच्या विस्ताराचे समर्थन
आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी ब्रिक्सच्या विस्ताराचे समर्थन केले. ते म्हणाले, नवीन सदस्य जोडल्याने ब्रिक्स, ही संघटना मजबूत होईल, असा भारताचा विश्वास आहे. या संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मी माझे मित्र रामाफोसा (दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष) यांचेही आभार मानतो आणि त्यांचे अभिनंदन करतो.
या देशांचा समावेश
ब्रिक्सचा आता विस्तार झाला असून, यामध्ये आणखी सहा देशांचा समावेश करण्यात आला आहे. इराण, अर्जेंटिना, इथिओपिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियाचा ब्रिक्समध्ये समावेश करण्यात आला असून, या संघटनेचे नामकरण 'ब्रिक्स प्लस' असे करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर बड्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती रामफोसा यांनी ही घोषणा केली आहे.