दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशाची आर्थिक नाकेबंदी करा- नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 12:35 PM2019-06-14T12:35:21+5:302019-06-14T12:35:42+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी बिश्केकमधील SCOच्या परिषदेत सहभागी झाले असून, त्यांनी आज परिषदेला संबोधित केलं आहे.
बिश्केक: पंतप्रधान नरेंद्र मोदी बिश्केकमधील SCOच्या परिषदेत सहभागी झाले असून, त्यांनी आज परिषदेला संबोधित केलं आहे. यावेळी पंतप्रधानांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला असून, दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत दहशतवादाचा क्रूर चेहरा समोर आला. सर्वच मानवतावादी शक्तींनी या दहशतवादाशी निपटण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. दहशतवाद्यांना निधी पुरवणाऱ्या देशांचं फंडिंग बंद केलं पाहिजे, असंही मोदी म्हणाले आहेत.
PM Modi in Bishkek: Literature & culture provide our societies a positive activity, stop the spread of radicalization among the youths. During my visit to Sri Lanka I visited the St. Anthony's shrine, where I witnessed the ugly face of terrorism that takes the lives of innocents. pic.twitter.com/JeSoVtb3Vg
— ANI (@ANI) June 14, 2019
सध्याच्या युगात चांगल्या कनेक्टिव्हिटी(संपर्काची)ची आवश्यकता आहे. SCO देशांच्या पर्यटकांसाठी लवकरच हेल्पलाइन जारी केली जाणार आहे. आमच्यासाठी शांतीपूर्ण आणि समृद्ध अफगाणिस्तान महत्त्वाचा आहे.
Bishkek: Prime Minister Narendra Modi had a 'pull-aside' meeting with President Alexander Lukashenko of Belarus on the margins of #SCOSummit. pic.twitter.com/w31Dfv9TZr
— ANI (@ANI) June 14, 2019
SCOमध्ये अफगाणिस्तानच्या विकासाचा रोड मॅप तयार झालेला आहे. मोदींनी जेव्हा दहशतवादाविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचे सूतोवाच केले, त्यावेळी तिथे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही उपस्थित होते.
PM Modi addressing leaders of member states at the SCO summit in Bishkek: India has been a permanent SCO member for 2 yrs now, we've given a positive contribution in all activities of SCO. We've continued engagements to enhance SCO's role & credibility on the international stage. pic.twitter.com/qjyx5unAWY
— ANI (@ANI) June 14, 2019
दहशतवाद पसरवण्यासाठी त्यांना समर्थन, प्रोत्साहन आणि आर्थिक मदत करणारे देश जबाबदार आहेत. 'टेररिज्म फ्री सोसायटी' झालीच पाहिजे. श्रीलंकेत गेलो होतो, तेव्हा दहशतवादाचा क्रूर चेहरा समोर आला. दहशतवादाविरोधात एससीओच्या सर्वच देशांनी एकत्र आलं पाहिजे. प्रत्येक देशानं आपल्या भूभागाला सुरक्षित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य मजबूत करणं आवश्यक आहे. हेल्थ केअर, इकॉनॉमिक, पर्यायी ऊर्जेच्या क्षेत्रात काम करावं लागणार आहे. भारत मेडिकल टुरिझम वाढवण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी बहुपक्षीय व्यापार प्रणाली गरजेची आहे. अक्षय ऊर्जेचा भारत सहावा आणि सौर ऊर्जेचा भारत पाचवा सर्वात मोठा उत्पादक देश आहे.
PM Narendra Modi addressing leaders of member states at the SCO summit in Bishkek, Kyrgyzstan: To tackle the danger of terrorism, all humanitarian powers should come forward together. Countries that provide encouragement, support, & finances to terrorism must be held accountable. pic.twitter.com/1h1vb9tgIU
— ANI (@ANI) June 14, 2019