नरेंद्र मोदी झोपणार ट्रम्पच्या बेडवर
By Admin | Published: July 1, 2017 02:51 PM2017-07-01T14:51:28+5:302017-07-01T14:51:28+5:30
3 जुलै रोजी नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या बेडवर झोपणार आहेत असे वृत्त इस्रायलमधील जेरुसलेम पोस्ट या दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.1- अमेरिकेसह तीन देशांचा दौरा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यामध्ये इस्रायलच्या दौऱ्यावर जाणार आहते. 3 जुलै रोजी नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या बेडवर झोपणार आहेत असे वृत्त इस्रायलमधील जेरुसलेम पोस्ट या दैनिकाने प्रसिद्ध केले आहे. वाचायला थोडीशी विचित्र असली तरी याचा अर्थ इस्रायलमध्ये किंग डेव्हीड हॉटेलच्या ज्या खोलीमध्ये डोनल्ड ट्रम्प राहिले होते त्याच सूटमध्ये नरेंद्र मोदी यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे असा आहे.
नरेंद्र मोदी हे इस्रायलला जाणारे पहिलेच भारतीय पंतप्रधान असल्यामुळे त्यांच्या दौऱ्याबाबत इस्रायलमध्ये कमालीची उत्सुकता आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी यांची योग्य प्रकारे सुरक्षा आणि इतर व्यवस्था योग्यप्रकारे होण्याची काळजी तेथे घेतली जात आहे. इस्रायलच्या माध्यमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वात महत्त्वाचे पंतप्रधान म्हणून नावाजले आहे. जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार इस्रायली अधिकाऱ्यांसाठी डोनल्ड ट्रम्प यांच्या भेटीपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट अधिक त्रासदायक ठरणारी आहे. पण ट्रम्प यांच्यांभेटीच्या तुलनेत मोदी यांच्या भेटीबाबत बंधने कमी आहेत. मोदी यांच्या भेटीसाठी किंग डेव्हीड हॉटेलचे पार्किंग आणि वरचा मजला रिकामा करण्यात आला आहे. या हॉटेलचे अध्यक्ष मालकल फेडरमन देखिल मोदींची भेट घेणार आहेत. फेडरमन हे संरक्षण इलेक्ट्रीक कंपनी एल्बिट सिस्टमचे अध्यक्ष आहेत. ही या कंपनीचेही भारताशी व्यापारी संबंध आहेत.
भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये शेती, पशुपालन, संरक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये व्यापारी संबंध आहेत. मौल्यवान खडे, तंत्रज्ञान, रसायने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, प्लास्टीक, खते, कपडे, औषधे अशा अनेक वस्तूंची आयात निर्यात हे देश करत असतात. या दोन्ही देशांनी २०१४ साली ४.५२ अब्ज डॉलर्सचा व्यापार (संरक्षण क्षेत्रातील खरेदी-विक्री वगळून) केला आहे. इस्रायलमध्ये तयार होणारे संरक्षण साहित्य खरेदी करणारा भारत हा सर्वात मोठा देश आहे.