जगातील सर्वात प्रभावशील व्यक्ती नरेंद्र मोदी; ट्रम्प, पुतीन यांना मागे टाकलं 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 09:44 AM2019-06-22T09:44:47+5:302019-06-22T09:45:26+5:30

ज्यामध्ये या सर्वांना मागे टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नंबर पटकावला. या निवड प्रक्रियेचं मुल्यांकन मतांची आकडेवारी, व्यापक संशोधनच्या आधारावर करण्यात आले आहे.

Narendra Modi Wins Reader’s Poll For World’s Most Powerful Person 2019 | जगातील सर्वात प्रभावशील व्यक्ती नरेंद्र मोदी; ट्रम्प, पुतीन यांना मागे टाकलं 

जगातील सर्वात प्रभावशील व्यक्ती नरेंद्र मोदी; ट्रम्प, पुतीन यांना मागे टाकलं 

Next

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती बनले आहेत. ब्रिटीश हेराल्ड 2019 च्या सर्वेक्षणात व्लादिमीर पुतीन, डोनाल्ड ट्रम्प यांना मागे टाकून मोदींनी बाजी मारली आहे. ब्रिटीश हेराल्डने जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती निवडण्यासाठी वाचकांचा पोल तयार केला होता. या नामांकनाच्या यादीत जगातील 25 प्रभावशाली व्यक्तींचा समावेश केला होता. अखेरच्या टप्प्यात समीक्षकांसमोर चार उमेदवारांची नावं ठेवण्यात आली. 

या चार जणांच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची नावे होती. ज्यामध्ये या सर्वांना मागे टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नंबर पटकावला. या निवड प्रक्रियेचं मुल्यांकन मतांची आकडेवारी, व्यापक संशोधनच्या आधारावर करण्यात आले आहे.

ब्रिटीश हेराल्डने वाचकांना मोस्ट पॉवरफुल पर्सन 2019 साठी मते नोंदवायला एक ओटीपी दिला होता. ज्यामुळे एका व्यक्तीला एकापेक्षा अधिक मते देणं शक्य नव्हतं. शनिवारी मतदानाची प्रक्रिया थांबली. नरेंद्र मोदी यांची जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून निवड झाल्यानंतर ब्रिटीश हेराल्डच्या कव्हर पेजला मोदींचा फोटो झळकणार आहे. 15 जुलै रोजी ब्रिटीश हेराल्डची पत्रिका प्रकाशित होईल. 


कोणाला किती मिळाले मते?
नरेंद्र मोदी - 30.9 टक्के 
व्लादिमीर पुतीन - 29.9 टक्के
डोनाल्ड ट्रम्प - 21.9 टक्के
शी जिगपिंग - 18.1 टक्के 

गेल्या काही महिन्यांमध्ये दहशतवादाविरोधात भारत सरकारने घेतलेली कठोर भूमिका, बालाकोट एअरस्ट्राईक आणि लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मोदींची लोकप्रियता प्रचंड वाढल्याचे भारतीय प्रसारमाध्यांचे म्हणणे असल्याचे निरिक्षण ‘ब्रिटिश हेराल्ड’ने नोंदवले आहे. या आधीही नरेंद्र मोदी यांनी फेसबुकवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्राझीलचे नवे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांना मागे टाकत फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून ओळख निर्माण केली होती. 2019 वर्ल्ड लीडर ऑन फेसबुक अहवालानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक फेसबुक पेजला 4.35 कोटी लाईक्स आहेत तर त्यांच्याशी जोडलेल्या इतर पेजला जवळपास 1.37 कोटी लाईक्स आहेत.


 

Web Title: Narendra Modi Wins Reader’s Poll For World’s Most Powerful Person 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.