चीनमधल्या भारतीयासंमोर वाजला नरेंद्र मोदींचा डंका

By admin | Published: May 16, 2015 02:29 PM2015-05-16T14:29:02+5:302015-05-16T15:40:22+5:30

शांघायमधल्या भारतीयांसमोर नेहमीच्या ओघवत्या शैलीत भाषण करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थितांची मने जिंकली आणि शांघायमध्येही मोदी मोदी असा गजर घुमला.

Narendra Modi's dancer in Bhartiya Sammorna in China | चीनमधल्या भारतीयासंमोर वाजला नरेंद्र मोदींचा डंका

चीनमधल्या भारतीयासंमोर वाजला नरेंद्र मोदींचा डंका

Next
>ऑनलाइन लोकमत 
शांघाय, दि. १६ - शांघायमधल्या भारतीयांसमोर नेहमीच्या ओघवत्या शैलीत भाषण करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थितांची मने जिंकली आणि शांघायमध्येही मोदी मोदी असा गजर घुमला.
चीन आणि भारत हे दोन देश एकत्र येत केवळ स्वताचंच नाही तर जगाचं भलं करू शकतात असे सांगणा-या मोदींनी चीनमधल्या भारतीयांनीही महत्त्वाची भूमिका बजावावी असं आवाहन केलं. मोदींच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे:
 
- हे शतक आशियाचं आहे त्यामुळे चीन व भारत यांचं हे शतक असल्याचं मोदी म्हणाले. - चीनमध्ये असलेल्या प्रत्येक भारतीयाने वर्षाला पाच चिनी नागरिकांना भारतात यायला उद्युक्त केलं तर केवळ पर्यटनाला चालना मिळणार नाही तर चिनी लोकांना भारत समजायला मदत होईल.
- ज्यावेळी जगात पर्यावरण संकटात नव्हतं त्यावेळी भारतीय ऋषीमुनींनी निसर्गावर प्रेम करायला शिकवलं. सकाळी उठल्यावर जमिनीला पाय लावण्याआधी पृथ्वीमातेला नमन करण्याचे संस्कार आपल्यावर झाले आहेत. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगवरही भारत उत्तर शोधेल असं मोदी म्हणाले. 
- जगाला सध्या आतंकवादानं ग्रासलं असून वसुधैव कुटुंबकम हा हजारो वर्षांपूर्वी मंत्र जपणारा भारत यावर जगाला मदत करेल असं मोदी म्हणाले.
- चीन आणि भारत दोघांची लोकसंख्या मिळून जगाच्या एक तृतीयांश असून हे दोन्ही देश एकत्र आले तर केवळ त्यांचंच भलं होणार नाही तर ते जगाचं भलं करतिल.
- चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी बीजिंगच्या बाहेर जाऊन दुस-या शहरात अन्य देशांच्या प्रतिनिधीमंडळाचे स्वागत केल्याची घटना इतिहासात पहिल्यांदाच घडल्याचे सांगत, हे स्वागत मोदींचे नव्हते तर सव्वाशे करोड भारतीयांचे होते असे मोदी म्हणाले.
- उद्या रविवारी मंगोलियाने सुट्टीच्या दिवशी संसदेचे अधिवेशन बोलावले असून मी सहभागी होणार आहे, असे सांगत नरेंद्र मोदींनी काळ बदलला असल्याचे सांगितले.
- गेल्या एका वर्षात माझ्या सरकारवर कुठलेही भलते सलते आरोप झाले नाहीत हे आमचे यश असल्याचे मोदी म्हणाले.
- माझ्या विरोधकांनी माझ्यावर खूप टीका केली होती, परंतु मी गेल्या एका वर्षात दिलेल्या वचनांना जागलो की नाही असे विचारत उपस्थित भारतीयांकडून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद वदवून घेतला.
- लोकसभेचा ऐतिहासिक निकाल लागल्याला आज बरोबर एक वर्ष झालं आणि दुखभरे दिन संपले आणि चांगले दिवस आले.
- शांघायमध्ये मोदींच्या नावाचा गजर. लवकरच शांघायमधल्या भारतीय समुदायासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण होणार असून सुमारे ७००० भारतीय मोदींचे भाषण ऐकण्यासाठी आतूर झाले आहेत.

Web Title: Narendra Modi's dancer in Bhartiya Sammorna in China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.