"पत्नीच्या मृत्यूनंतर किती दिवसांनी लग्न करता येईल"; ६ महिन्यांनी झाला निर्घृण हत्येचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 03:39 PM2024-12-04T15:39:39+5:302024-12-04T15:57:00+5:30
पत्नीच्या हत्येनंतर गुगलवर काहीतरी सर्च केले आणि तो थेट तुरुंगात गेला
Crime News : अमेरिकेत नेपाळमधील एका नागरिकावर पत्नीच्या हत्येचा खटला दाखल करण्यात आला आहे. नरेश भट असं आरोपीचे नाव असून त्याने २८ वर्षीय पत्नी ममता भट्टची हत्या केली होती. या आरोपावरून पती नरेश भट्ट यांना अमेरिकन कोर्टात आरोपी करण्यात आले आहे. ममता आणि नरेश हे दोघेही मूळचे नेपाळी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता एका गुगल सर्चमुळे नरेश भट्ट याचा गुन्हे उघडकीस आला आहे.
अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यात राहणारे नरेश भट्ट याने नेपाळी वंशाच्या ममता काफले भट्टसोबत लग्न केले होते. जुलै २०२४ मध्ये एके दिवशी ममता अचानक बेपत्ता झाली होती. नरेशने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास केला, मात्र बराच वेळ कोणताही पुरावा हाती लागत नव्हता. मग अचानक एके दिवशी तपास करणाऱ्या पोलिसांना महत्त्वाचा पुरावा लागला. पोलिसांना नरेशचा एका जुना गुगल सर्च सापडला ज्यावरुन त्यानेच गुन्हा केल्याचं उघड झालं.
त्याचं असं झालं की ममताच्या हत्येचं गूढ उकलणाऱ्या पथकाला नरेशवर संशय होता. त्यामुळे त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटपासून त्याच्या इमेल्सपर्यंत सर्व गोष्टींचा शोध घेण्यात आला. कुठेही काही सापडले नाही. पण नंतर नरेशची गुगल सर्च हिस्ट्री तपासली असता एका सर्चने पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला. नरेशने पत्नीचा खून करण्यापूर्वीच दुसऱ्या पत्नीचा शोध सुरू केल्याचे तपासात उघड झाले. बेपत्ता होण्याच्या काही महिने आधी नरेशने गुगलवर, "बायकोच्या मृत्यूनंतर किती दिवस पुन्हा लग्न करता येईल?" असं सर्च केलं होतं.
हा पुरावा पोलिसांच्या संशयाला विश्वासात रुपांतर करण्यास पुरेसा होता. नरेशला ताब्यात घेऊन चौकशी केली असता संपूर्ण सत्य बाहेर आले. व्हर्जिनिया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ममताचा मृतदेह घराच्या आत होता. तो ओढून घराबाहेर काढण्यात आला होता.
दरम्यान, ममता यूव्हीए हेल्थ प्रिन्स विल्यम मेडिकल सेंटरमध्ये नर्स म्हणून काम करत होती. त्याच वेळी, नरेश भट्ट हे यूएस आर्मीमध्ये राखीव स्वयंचलित लॉजिस्टिक विशेषज्ञ आहे. जून २०१८ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत त्याने या विभागात काम केले होते. दोघांचेही सुमारे ४ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोघांनाही एक वर्षाची मुलगी आहे.