आता काढा आकाशगंगेबरोबर सेल्फी, नासाने आणले नवे अॅप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 11:52 AM2018-08-24T11:52:08+5:302018-08-24T11:53:06+5:30
आता नासाने तयार केलेल्या एका अॅपमुळे लोकांना अंतराळातील ग्रहताऱ्यांबरोबर सेल्फी काढता येणार आहे. तसेच ट्रॅपिस्ट-1 या ग्रहमंडळाबरोबरही सर्वांना सेल्फी काढता येणार आहे.
न्यू यॉर्क- अंतराळातील विविध ग्रह ताऱ्यांबद्दल, आकाशगंगांबद्दल सर्वांनाच कुतुहल असते. पृथ्वीच्या पलीकडे या विश्वामध्ये नक्की काय आहे, कसे आहे याबद्दल मानवाला हजारो वर्षांपासून प्रश्न पडत आहेत. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण किंवा एखाद्या नव्या ताऱ्याचा शोध लागतो तेव्हा मिळणाऱ्या माहितीमुळे यातील काही प्रश्नांचे उत्तरही मिळत असते.
आता नासाने तयार केलेल्या एका अॅपमुळे लोकांना अंतराळातील ग्रहताऱ्यांबरोबर सेल्फी काढता येणार आहे. तसेच ट्रॅपिस्ट-1 या ग्रहमंडळाबरोबरही सर्वांना सेल्फी काढता येणार आहे. ट्रॅपिस्ट 1 मध्ये पृथ्वीच्या आकाराचे सात ग्रह आहेत. खगोलप्रेमींसाठी ही एक अनोखी भेटच म्हणावी लागेल. RAD असे या अॅपचे नाव आहे.
नासाने स्पीट्झर स्पेस टेलिस्कोप या दुर्बिणीद्वारे अंतराळात अनेक शोध लावले आहेत. तसेच अंतराळातील लाखो अनोख्या ग्रहताऱ्यांची, घटनांची छायाचित्रे टिपली आहेत. या दुर्बिणीचे कामकाज सुरु होऊन 15 वर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ नासाने हे अॅप तयार केले आहे.
Oops I’m obsessed with the NASA Selfies app pic.twitter.com/yL5Y0aTRZl
— Sarah ✨ Frazier (@sarahfrzr) August 23, 2018
आकाशगंगेच्या मध्यभागी तिंवा ओरियन नेब्युलाच्या शेजारी स्पेससूट घालून उभे आहोत अशा पद्धतीचा आभास तयार करुन लोकांना फोटो काढता येणार आहेत. हे सर्व फोटो आभासी असतील. अशा प्रकारचे सेल्फी काढण्यामागे कोणते विज्ञान आहे याचीही माहिती नासा देणार आहे. स्पीट्झरने काढलेल्या 30 फोटोंचा समावेश सध्या यात केलेला आहे. इतर अनेक फोटो या अॅपमध्ये लवकरच समाविष्ट केले जातील.
Tried the @NASA selfies app. pic.twitter.com/ryMaexw9If
— GrantPetersen (@GP_O11) August 23, 2018
सौरमालेच्या बाहेर सफर
हे अॅप सौरमालेच्या बाहेर सफर घडवून आणणार आहे. अॅप वापरणाऱ्या लोकांना ट्रॅपिस्ट-1 ग्रहमंडळाची सफर करता येईल आणि त्यातील ग्रहांची माहितीही देण्यात येईल. हे ग्रह नासाच्या दुर्बिणीपासून फारच दूर आहेत. त्यामुळे त्यांचे जवळून निरीक्षण करता येणे सध्या शक्य नाही. मात्र व्हर्च्युअल रिअॅलिटीच्या मदतीने ते कसे असावेत, त्यांची रचना कसी आहे याची माहिती मिळेल.