१९७ दिवसांनी अंतराळातून परतला अन् चालणंच विसरला!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 02:51 PM2018-12-26T14:51:37+5:302018-12-26T14:51:50+5:30
अनेक सिनेमांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, अंतराळात मोहिमेवर जाण्यासाठी अंतराळवीरांना किती आणि कशी तयारी करावी लागते.
अनेक सिनेमांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, अंतराळात मोहिमेवर जाण्यासाठी अंतराळवीरांना किती आणि कशी तयारी करावी लागते. पण दुसरी बाजू अशीही आहे की, जेवढी तयारी त्यांना तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी करावी तितकीच त्यांना परत आल्यावर नॉर्मल होण्यासाठी करावी लागते. हेच दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. अंतराळातून परत आलेला एक अंतराळवीर धड चालूही शकत नाहीये.
ही व्हिडीओ क्लीप अंतराळवीर ए.जे. फ्यूस्टल यांनी शेअर केला आहे. जे नासाच्या एका स्पेस मिशनचा भाग होते. ते या मोहिमेसाठी अंतराळात तब्बल १९७ दिवस होते. त्यानंतर तो ५ ऑक्टोबर २०१८ ला पृथ्वीवर परत आले होते. ए.जे. सहीत आणखी तीन लोकांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पाठवण्यात आलं होतं.
Welcome home #SoyuzMS09 ! On October 5th this is what I looked like walking heel-toe eyes closed after 197 days on @Space_Station during the Field Test experiment...I hope the newly returned crew feels a lot better. Video credit @IndiraFeustelpic.twitter.com/KsFuJgoYXh
— A.J. (Drew) Feustel (@Astro_Feustel) December 20, 2018
या मोहिमेत त्यांना तिथे असलेल्या ऑर्बिट लेबॉरेटरीला सुरु करण्यासोबतच स्पेसवॉक करण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्यांनी त्यांच्या १९७ दिवसांच्या तेथील वास्तव्यात वेगवेगळे शोध केलेत. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, 'तुझं स्वागत आहे सियोज एमएस०९, हा ऑक्टोबर ५ चा व्हिडीओ आहे. तेव्हा मी फील्ड टेस्ट एक्सपरिमेंटसाठी स्पेसमध्ये १९७ दिवस राहून आलो होतो. मला आशा आहे की, नुकत्याच परत आलेल्या इतर सदस्यांची स्थिती चांगली असेल'.
ए.जे. आणि त्यांच्या टीम व्यतिरिक्त आणखी तीन लोकांना अंतराळात पाठवण्यात आलं होतं. ए.जे. ने हे ट्विट त्या लोकांसाठी केलं होतं. दुसरी टीम २० डिसेंबरला अंतराळातून परत आली. यावेळी नासाच्या सेरेना ऑनन-चान्सलर, रशियाच्या सर्गेई रोकोयेव आणि जर्मनीच्या अलेक्झांडर गर्स्ट यांचा समावेश करण्यात आला होता. अंतराळवीर सेरेना ऑनन-चान्सलर आणि सर्गेई रोकोयेव यांची पहिली आणि गर्स्टची दुसरी मोहिम होती. या तिघांनीही अंतराळात १९७ दिवस वास्तव्य केलं.