चंद्रावर 'नासा'ची स्वच्छता मोहीम, 50 वर्षापूर्वी केलेला कचरा पुन्हा आणणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 05:27 PM2019-04-10T17:27:02+5:302019-04-10T17:29:05+5:30
चंद्रमोहिमेत अंतराळवीरांनी चंद्रावर केलेला कचरा पृथ्वीवर आणण्यासाठी 'नासा'ने विशेष मोहीम हाती घेतली आहे. 2024 पर्यंत नासाने चंद्रावरील कचरा पुन्हा पृथ्वीवर आणण्याचे ठरवले आहे.
न्यूयॉर्क : 50 वर्षापूर्वी पहिल्यांदा माणसाने चंद्रावर पाऊल ठेवलं होतं. मानवी इतिहासातला तो ऐतिहासिक क्षण होता. त्यावेळी चंद्रावरून दगड आणि मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यात आले होते. चंद्रमोहिमेत अंतराळवीरांनी चंद्रावर केलेला कचरा पृथ्वीवर आणण्यासाठी 'नासा'ने विशेष मोहीम हाती घेतली आहे. 2024 पर्यंत नासाने चंद्रावरील कचरा पुन्हा पृथ्वीवर आणण्याचे ठरवले आहे.
नासाच्या या मोहिमेत एकूण 12 वैमाज्ञिक सहभागी झाले होते. मात्र या वैमाज्ञिकांना जवळपास 96 पिशव्या मानवी मल आणि इतर कचरा चंद्रावरच सोडून आले होते. मानवाने तिथे निर्माण केलेला कचरा पुन्हा आणून नासा संशोधन करणार आहे. चंद्रावर गेलेल्या स्पेसक्राफ्टमधून ठरावीक वजन वाहून नेण्याची क्षमता होती. मात्र चंद्रमोहिमेवरुन परत येताना आर्म्सस्ट्राँगची इच्छा नसतानाही जवळपास 100 वस्तू त्यांना चंद्रावर सोडाव्या लागल्या. ज्यामध्ये स्पेस, बूट्स, टूल्स आणि अन्य वस्तूंचा समावेश आहे. स्पेसक्राप्टमध्ये वजनापेक्षा अधिक सामान पुन्हा परतताना आणले असते तर अंतराळवीरांसाठी धोकादायक होतं. 'नासाकड़ून चंद्रावरची मोहीम लवकरात लवकर सुरू करण्याच्या हालचाली सुरु आहे. अंतराळवीरांनी अवकाशात काहीच दिवस व्यतित केले होते. अंतराळवीरांना आपले मल-मुत्र अंतराळात सोडण्याची गरज भासू नये यासाठी ‘नासा’ने त्यांच्यासाठी खास पोषाख बनवले होते, ज्यामध्ये डायपरही होते.
“We’ve been given an ambitious and exciting goal. History has proven when we’re given a task by the president, along with the resources and the tools, we can deliver,” says Administrator @JimBridenstine about #Moon2024 plans. Read more: https://t.co/P0meiea8o0pic.twitter.com/ED77kCwQp7
— NASA (@NASA) April 9, 2019
आर्म्सस्ट्राँगकडून सोडण्यात आलेल्या गोष्टींपेक्षा महत्त्वाचं होतं ते चंद्रावरील दगड आणि माती त्याचसोबत आर्म्सस्ट्राँगकडून चंद्रावर अमेरिकेचा झेंडाही निशाण म्हणून ठेवण्यात आला होता. या घटनेला जवळपास 50 वर्ष पूर्ण होत आहे. 'नासा'चे शास्त्रज्ञ हा कचरा पुन्हा पृथ्वीवर आणून चंद्रावरील जीवनमानाचा शोध लावणार आहे
नासाला का परत आणायच्या आहेत बॅग्स?
मानवी मलामधून चंद्रावरील जीवसृष्टीचा शोध नासाला घ्यायचा आहे. त्याचसोबत या मिशनसोबत अन्य काही गोष्टींचा उलगडाही होऊ शकतो अशी शक्यता नासाला वाटत आहे. कचर्याच्या पिशव्या कडक झाल्या तर त्यात बॅक्टेरिया आहेत यावर शिक्कामोर्तब होईल.जर बॅक्टेरिया मृत असतील तर त्यांच्या अभ्यास करणे महत्त्वपूर्ण ठरेल. कारण हे बॅक्टेरिया किती काळ जिवंत होते याचा शास्त्रज्ञ शोध लावू शकतील. मानवी मलमूत्रात आजही बॅक्टेरिया जिवंत आहेत का हे जाणून घेण्याची उत्सुकता शास्त्रज्ञांना आहे.