Video : NASA ने 10 वर्षे सूर्यावर नजर ठेऊन बनवला व्हिडिओ, सोशल मीडियावर धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 04:46 PM2020-06-27T16:46:09+5:302020-06-27T16:49:52+5:30
नासाच्या सोलर ऑब्जर्वेटरीने 10 वर्षे सूर्य ग्रहावर नजर ठेवली होती, त्यासोबतच त्याने सूर्याच्या 45 कोटी हाय-रेज्युलेशनचे छायाचित्रे घेतली आहेत. तसेच 2 कोटी गीगाबाईट डेटाही जमा केला आहे.
वॉशिंग्टन - अमेरिकेतील जगविख्यात स्पेस एजन्सी नासाने एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या व्हायरल व्हिडिओत नासाच्या सोलर डायनेमिक्स ऑब्जर्वेटरीने तब्बल 10 वर्षे सूर्यावर नजर ठेऊन या व्हिडिओचे चित्रीकरण केले आहे. या कालावधीत ऑब्जर्वेटरीने अनेक महत्त्वपूर्ण निरीक्षणे टिपली आहेत. त्यातूनच सूर्य ग्रहासंबंधातील काही महत्वाची माहितीही नासाने शेअर केली आहे. नासाने शेअर केलेल्या माहितीचा अभ्यास केल्यास तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
नासाच्या सोलर ऑब्जर्वेटरीने 10 वर्षे सूर्य ग्रहावर नजर ठेवली होती, त्यासोबतच त्याने सूर्याच्या 45 कोटी हाय-रेज्युलेशनचे छायाचित्रे घेतली आहेत. तसेच 2 कोटी गीगाबाईट डेटाही जमा केला आहे. नासाच्या एका स्टेटमेंटनुसार, टाईम लैप्स व्हिडिओ जारी करण्यात आला असून टाईम लैप्स फुटेजमध्ये सूर्याच्या 11 वर्षांपासून सुरु असलेल्या सौर चक्राच्या गतीमधील वाढ आणि घट दाखविण्यात आली आहे. या गतीमानतेमुळे शास्त्रज्ञांना आपल्या सर्वात जवळच्या ताऱ्यांच्या कामकाजाबद्दलची अधिक प्रभावीपणे माहिती घेता येईल. तसेच, सौर मंडलास कशाप्रकारे प्रभावित करतात याचीही माहिती मिळाली आहे. नासाच्या संशोधनानुसार, सूर्याचे चुंबकीय क्षेत्र एका चक्रातून जाते, त्यास सौर चक्र असे म्हणतात. दर ११ वर्षांनी सूर्याचे चुंबकीय क्षेत्र पूर्णपणे बदलले जाते.
10 years.
— NASA (@NASA) June 24, 2020
20 million gigabytes of data.
425 million hi-res images of the Sun.
A new time-lapse video marks a decade of operations for our @NASASun Solar Dynamics Observatory. Watch: https://t.co/jRRWuBfcLbpic.twitter.com/SPBDWfJwzP
नासाने व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, नासाने सूर्याच्या 10 वर्षांना केवळ 61 मिनिटींच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले आहे. यादरम्यान, यामध्ये प्रत्येक मिनिटाला एका छायाचित्राचा वापर करण्यात आला आहे. या व्हिडिओत एका सेकंदात एक दिवस दाखविण्यात आला आहे. डिकेट ऑफ सन नावाने बुधवारी हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.