NASA ने शेअर केला सुर्याचा खरा व्हिडिओ, लोक म्हणाले- खरा आहे की खोटा ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 02:17 PM2021-07-29T14:17:10+5:302021-07-29T14:18:49+5:30

NASA shares sun's video: नासाने व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अवघ्टा 9 तासात 3 कोटी लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

NASA shared a real video of the sun on social media | NASA ने शेअर केला सुर्याचा खरा व्हिडिओ, लोक म्हणाले- खरा आहे की खोटा ?

NASA ने शेअर केला सुर्याचा खरा व्हिडिओ, लोक म्हणाले- खरा आहे की खोटा ?

googlenewsNext

अंतराळ हा शेकडो वर्षांपासून आपल्यासाठी सर्वांसाठीच एक रहस्य आणि आकर्षणाचा विषय आहे. पूर्वी तंत्रज्ञान नव्हतं म्हणून अंतराळाची माहिती मिळवणं अवघड होतं. पण, आता तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे वैज्ञानिकांना अंतराळातील बरीच माहिती मिळू लागली आहे. याशिवाय, जगभरातील अनेक अंतराळ संस्थांच्या सोशल मीडियाला धन्यवाद, ज्यांच्यामुळे सामान्य नागरिकांना अंतराळातील घटना किंवा दृष्य पाहता येत आहेत. अमेरिकेतील अंतराळ संस्था नासा (NASA) देखील आपल्या सोशल मीडिया हँडलवर अंतराळातील विविध दृष्यांचे फोटो किंवा व्हिडिओ टाकतच असते. 

आता नासाने आपल्या सोशल मीडिया हँडलवर सुर्याचा एक व्हिडिओ टाकला आहे. यात सुर्याच्या पृष्ठभागावरील कोरोनल मास इजेक्शन (सीएमई) किंवा याला सामान्य भाषेत ज्वालामुखीसारखा उद्रेक झालेला दिसत आहे. आपल्या पोस्टसह नासाने कॅप्शन लिहीले, "वायुमंडळातील प्लाज्माच्या तरंग अंतराळातील अब्जावधी कणांवर 1 मिलियन मैल किंवा 1,600,000 किलोमीटर प्रति तासांच्या वेगाने मारा करतात."

नासाने सांगितले की, त्यांच्या सोलर डायनेमिक्स ऑब्जर्वेटरी (एसडीओ)ने हे दृष्य 2013 मध्ये कॅप्चर केले आहे. दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नासाने व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अवघ्टा 9 तासात 3 कोटी लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या पोस्टवर एका युझरने कमेंट केली, हा खरा व्हिडिओ आहे का ? त्यावर नासाने म्हटले, हो. हा सुर्याचा खराब व्हिडिओ आहे. आमच्या सोलर डायनेमिक्स ऑब्जर्वेटरीने एका लाइट फिल्टरच्या मदतीने हा कॅप्चर केला आहे.

Web Title: NASA shared a real video of the sun on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.