सूर्याच्या प्रभामंडळाला स्पर्श करणारे अंतराळ यान; ऐतिहासिक घटना असल्याचे नासाचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 11:06 AM2021-12-16T11:06:13+5:302021-12-16T11:06:35+5:30

“आम्ही सूर्याला स्पर्श केला आहे” अशा शब्दांत अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने म्हटले.

NASA Spacecraft Touches The Sun For The First Time Ever | सूर्याच्या प्रभामंडळाला स्पर्श करणारे अंतराळ यान; ऐतिहासिक घटना असल्याचे नासाचे मत

सूर्याच्या प्रभामंडळाला स्पर्श करणारे अंतराळ यान; ऐतिहासिक घटना असल्याचे नासाचे मत

Next

वॉशिंग्टन : “आम्ही सूर्याला स्पर्श केला आहे” अशा शब्दांत अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने म्हटले. हा ऐतिहासिक मुक्काम आहे, असे म्हणून नासाने तिच्या अंतराळाच्या शोध घेणाऱ्या मानवरहित अवकाश यानापैकी एकाने सूर्याला प्रथमच ‘स्पर्श’ कसा केला हे सविस्तर सांगणारी पोस्ट इन्स्टाग्रामवर दिली आहे.

सूर्याला स्पर्श करीत असलेले अंतराळ यान व्हायरल झाले आहे. “आम्ही सूर्याला स्पर्श केला आहे. इतिहासात प्रथमच अंतराळ यानाने सूर्याच्या प्रभामंडळात (कोरोना) प्रवेश केला आहे. प्रवेश केला तो बिंदू सूर्याच्या वातावरणाचा असून, तेथे त्याचे लोहचुंबकत्व आणि गुरुत्वाकर्षण हे इतके तीव्र असते की त्यामुळे सोलार मटेरियल निसटून जाण्यास अटकाव होतो.” नासाने पुढील काही ओळींमध्ये या घटनेचे महत्त्व काय आणि सूर्याबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी वैज्ञानिकांना त्याची कशी मदत होणार आहे याचा खुलासा केला आहे.

सूर्य ज्यापासून बनला त्या गोष्टीला स्पर्श केल्यामुळे वैज्ञानिकांना आमच्या जवळ असलेल्या ताऱ्याची अतिशय महत्त्वाची आणि सूर्यमालेवर तिच्या प्रभावाची माहिती उपलब्ध होण्यास मदत मिळेल. उदाहरणार्थ, पार्कर सोलार प्रोबच्या सूर्याच्या प्रभामंडळातील प्रवासाने आधीच खगोलशास्रज्ञांना सौर वाऱ्यात (सोलार विंड म्हणजे सूर्याच्या वरच्या वातावरणातून निघालेले विद्युतभारित कण म्हणजे ज्याला प्रभामंडळ अर्थात कोरोना म्हणतात जे असामान्य नागमोडी आढळले त्यांचे उगमस्थान समजून घेण्यास आधीच मदत होत आहे. हे सौर वारे पृथ्वीच्या समोरून आणि ग्रहांच्या पलीकडे वाहात असतात. पार्कर आाधीच सूर्याजवळ १० वेळा गेला आहे आणि पुढील चार वर्षे माहिती गोळा करण्यासाठी पार्कर त्याच्या आणखी जवळ जाणार आहे,” असेही पोस्टमध्ये म्हटले.

छोट्या कालावधीसाठी झेप
नासाने म्हटले, “२०१८ मध्ये पाठविण्यात आलेले आमच्या पार्कर सोलार प्रोब अंतराळ यानाने यावर्षीच्या प्रारंभी पहिल्यांदा सूर्याच्या प्रभामंडळातून अगदी छोट्या कालावधीसाठी झेप घेतली.”

Web Title: NASA Spacecraft Touches The Sun For The First Time Ever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.