‘नासा’ मंगळावर दोन, तर गुरूवर एक यान पाठविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 02:26 AM2017-12-21T02:26:50+5:302017-12-21T02:27:13+5:30
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ येत्या काही दिवसांत मंगळावर दोन, तर गुरू ग्रहावर एक यान पाठविणार आहे. या यानांच्या माध्यमातून दोन्ही ग्रहांवरील नवीन माहिती मिळेल, असे ‘नासा’चे वरिष्ठ अँटेना व मायक्रोवेव्ह शास्त्रज्ञ डॉ. नासेर चाहत यांनी बुधवारी सांगितले. एमआयटी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातर्फे कोलकाता येथील चॅप्टर आॅफ आयईईई, मुंबई येथील आयईईई बॉम्बे सेक्शन आणि नागपूर येथील प्रियदर्शिनी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने शहरात ६व्या ‘अप्लाइड इलेक्ट्रो मॅग्नेटिक-२०१७’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ येत्या काही दिवसांत मंगळावर दोन, तर गुरू ग्रहावर एक यान पाठविणार आहे. या यानांच्या माध्यमातून दोन्ही ग्रहांवरील नवीन माहिती मिळेल, असे ‘नासा’चे वरिष्ठ अँटेना व मायक्रोवेव्ह शास्त्रज्ञ डॉ. नासेर चाहत यांनी बुधवारी सांगितले.
एमआयटी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातर्फे कोलकाता येथील चॅप्टर आॅफ आयईईई, मुंबई येथील आयईईई बॉम्बे सेक्शन आणि नागपूर येथील प्रियदर्शिनी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने शहरात ६व्या ‘अप्लाइड इलेक्ट्रो मॅग्नेटिक-२०१७’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेचे उद्घाटन शास्त्रज्ञ डॉ. राज मित्रा यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी एमआयटीचे महासंचालक मुनीष शर्मा होते. या वेळी मंचावर पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट आॅफ अॅडव्हान्सड टेक्नॉलॉजीचे कुलगुरू डॉ. सुरेंद्र पाल, अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ. सतीश शर्मा, कोलकाता विद्यापीठातील डॉ. देबातोश गुहा, शास्त्रज्ञ डॉ. सत्यजित चक्रवर्ती आणि आयोजक डॉ. अभिलाषा मिश्रा उपस्थित होत्या.
उद्घाटनानंतर पहिल्या सत्रात डॉ. राज मित्रा यांनी ‘भविष्यातील मेटा अटॉम्स आणि मेटा सरफेस बिल्डिंग ब्लॉक अँटेना’ या विषयावर बीजभाषण केले. दुसºया सत्रात डॉ. नासेर चाहत यांनी ‘रिफ्लेक्ट अॅरे अॅण्ड रिफ्लेक्टर अँटेना’ या विषयावर संशोधन पेपर सादर केला.