NASA: नासाने मंगळासारख्या वातावरणात वर्षभर राहण्यासाठी अर्ज मागवले; फक्त याच लोकांना संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 05:52 PM2021-08-08T17:52:34+5:302021-08-08T17:53:31+5:30
NASA Mars news: नासाने सांगितले की, मंगळावर भविष्यातील मिशनमध्ये तेथील प्रत्यक्षातील जीवन आणि आव्हाने पेलण्यासाठी नासा याद्वारे अभ्यास करणार आहे. यामध्ये निवडलेल्या व्य़क्ती कशा प्रकारे या आभासी परिस्थितींमध्ये राहतात हे पाहिले जाणार आहे.
अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने (NASA) मंगळ ग्रहासारख्या वातावरणात (MARS) साधारण वर्षभर राहण्यासाठी अर्ज मागविले आहेत. नासामंगळ ग्रहावर प्रवाशांना पाठविण्याआठी त्यांना भविष्यातील मिशनच्या वास्तविक आव्हानांसाठी तयार करण्यात येत आहे. (NASA said on Friday that it is seeking a few good men and women to assist in the advancement of its goal of transporting people to Mars by 2037.)
शुक्रवारी नासाने मंगळ ग्रहासारख्या परिस्थिती असलेल्या जागेवर राहण्यासाठी अर्ज मागवले आहेत. साधारण वर्षभर अशा जागी त्यांना रहावे लागणार आहे. चार लोकांची यासाठी निवड केली जाणार आहे. हे लोक 1700 वर्ग फूट जागेमध्ये थ्रीडी प्रिंटरद्वारे बनविलेल्या मार्स ड्यून अल्फामध्ये राहणार आहेत. ही ह्युस्टनच्या जॉन्सन स्पेस सेंटरची इमारत आहे.
नासाने सांगितले की, मंगळावर भविष्यातील मिशनमध्ये तेथील प्रत्यक्षातील जीवन आणि आव्हाने पेलण्यासाठी नासा याद्वारे अभ्यास करणार आहे. यामध्ये निवडलेल्या व्य़क्ती कशा प्रकारे या आभासी परिस्थितींमध्ये राहतात हे पाहिले जाणार आहे.
विशेष म्हणजे मंगळ ग्रहावर जसे वातावरण, धूळ आदी आहे तसेच वातावरण इथे बनविण्यात आले आहे. यामध्ये तशीच आव्हाने तयार करण्यात आली आहेत. उपकरण बिघाड, मर्यादा, संचार आणि अन्य पर्यावरणीय तणावदेखील असणार आहे. यामध्ये निवड झालेले लोक रोबोट, सिम्युलेटेड स्पेसवॉक, नवे तंत्रज्ञान आणि आभासी पर्यावरणाचा अनुभव घेणार आहेत.
नासा अशा तीन मोहिमा आखणार आहे. यापैकी पहिली मोहिम पुढील वर्षी 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर अशी असणार आहे. त्या आधी निवडलेल्या ४ लोकांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे. हा अर्ज फक्त अमेरिकी नागरिक करू शकतात. त्य़ांचे वय 30 ते 55 वर्षे असावे. चांगली इंग्रजी, आरोग्य असावे. धूम्रपान करणारा नसावा अशा अटी आहेत.