NASA'ची मोठी घोषणा! सुनीता विल्यम्स फेब्रुवारीमध्ये स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानातून पृथ्वीवर येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 12:01 AM2024-08-25T00:01:34+5:302024-08-25T00:03:54+5:30

NASA : फेब्रुवारीमध्ये स्पेस स्टेशनवरून सुनीता विल्यम्सला पृथ्वीवर आणणार असल्याची घोषणा नासाने केली आहे. यासाठी स्पेसएक्सच्या ड्रॅगन क्रू कॅप्सूलची मदत घेणार आहे.

NASA's big announcement Sunita Williams will return to Earth on SpaceX's Dragon spacecraft in February | NASA'ची मोठी घोषणा! सुनीता विल्यम्स फेब्रुवारीमध्ये स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानातून पृथ्वीवर येणार

NASA'ची मोठी घोषणा! सुनीता विल्यम्स फेब्रुवारीमध्ये स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानातून पृथ्वीवर येणार

गेल्या काही दिवसांपासून अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर तांत्रिक अडचणींमुळे अंतराळात अडकले आहेत. ते परत पृथ्वीवर कधी येणार या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आता यावर नासाने आज मोठी घोषणा केली आहे. स्पेसएक्सच्या ड्रॅगन क्रू कॅप्सूलद्वारे सुनीता विल्यम्स पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पृथ्वीवर परतणार आहेत. अमेरिकन अंतराळ संस्था नासाने याची घोषणा केली आहे. 

जबरदस्त! 5G'चं सोडा, आता भारतात 6G सुरू होणार; ज्योतिरादित्य सिंधिया यांनी प्लॅनिंग सांगितलं

नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी सांगितले की, हे दोन्ही अंतराळवीर क्रू-9 सह सुरक्षितपणे पृथ्वीवर परततील.

५ जुलै २०२४ रोजी जेव्हा सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अंतराळयानाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पोहोचले. आठ दिवस राहण्याचा प्लॅन होता. मात्र बोइंगच्या स्टारलाइनर कॅप्सूलमध्ये तांत्रिक अडचण आली. आता ८ महिन्यांत प्रवास बदलला आहे. आता हे दोघेही पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पृथ्वीवर परततील. 

जर स्टारलाइनर काम करत नसेल तर स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन मिशनद्वारे दोघांनाही पृथ्वीवर आणले जाईल. मात्र यासाठी फेब्रुवारी २०२५ पर्यंत वेळ लागू शकतो.

सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर यांना कोणताही धोका नाही. हे दोघेही स्पेस स्टेशनवर पुढील सहा महिने आरामात राहू शकतात. सध्या अंतराळ स्थानकावर सात अंतराळवीर उपस्थित आहेत. अंतराळवीरांना प्रवास वाढवावा लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. मात्र, स्टेशनवर सुनीता विल्यम्सचा हा पहिलाच अनपेक्षित लांब मुक्काम आहे.

अंतराळ स्थानकावर सध्या सात अंतराळवीर आहेत. यात सुनीता विल्यम्स आणि विलमोर आहेत. अंतराळ स्थानक इतके मोठे आहे की तेथे आणखी अंतराळवीर राहू शकतात.

स्पेस स्टेशनमध्ये सहाहून अधिक बेडरूमसाठी जागा आहे. यात सहा झोपण्याचे क्वार्टर आहेत. एक व्यायामशाळा आहे. अंतराळवीर ज्या अंतराळयानातून प्रवास करतात. ते त्याच्याशी जोडलेले राहतात. जास्त प्रवासी असल्यास त्यातही झोपता येते. नुकतेच आता अंतराळात साहित्य पाठवण्यात आले आहे. यामुळे आता अंतराळवीरांना खाण्यापिण्याची टंचाई भासणार नाही.

Web Title: NASA's big announcement Sunita Williams will return to Earth on SpaceX's Dragon spacecraft in February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :NASAनासा