नासाचे कॅप्सूल पृथ्वीकडे निघाले! अंतराळातून उल्कापिंडांचे खडक घेऊन येतेय...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 06:51 PM2023-09-24T18:51:54+5:302023-09-24T18:52:11+5:30
ओसीरिस-आरएक्स हे पृथ्वीवर येणार नाहीय, तर एका बंदिस्त कॅप्सुल ते पृथ्वीवर सोडणार आहे.
इस्त्रो, जपानसारख्या देशांच्या अंतराळ संस्था चंद्र, सुर्याकडे गेलेले असताना नासाचे कॅप्सूल अंतराळातून उल्कापिंडांचे नमुने घेऊन पृथ्वीकडे झेपावले आहे. स्पेस कॅप्सूल खडकाळ साहित्य आणत आहे, हे एका मोठे पाऊल ठरणार आहे. हजारो किमीचा वेग असलेल्या उल्कापिंडांपासून नासाने हे नमुने मिळविले आहेत.
Osiris-RX स्पेस कॅप्सूल 63,000 मैल दूरवरून निघाले आहे. कॅप्सूल चार तासांनंतर लष्कराच्या उटाह चाचणी आणि प्रशिक्षण केंद्रामध्ये पॅरॅशुटच्या साह्याने उतरणार आहे. बेन्नू नावाच्या उल्कापिंडावरून एक कपभरून दगड मिळविण्याची अपेक्षा शास्त्रज्ञांना आहे.
या नमुन्यांच्या मदतीने, शास्त्रज्ञ पृथ्वी आणि जीवन कसे तयार झाले हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकणार आहेत. Osiris-RX ने 2016 मध्ये उड्डाण केले होते. दोन वर्षांनंतर हे उल्कापिंड बिन्नूवर उतरले होते. Osiris-RX ने सर्वात कठीण आव्हानांचा सामना केला आणि 2020 मध्ये लघुग्रह बेन्नूच्या पृष्ठभागावरून रॉक सामग्री (धूळ आणि खडे) गोळा केली होती. आत्तापर्यंत Osiris-RX ने 6.2 अब्ज किलोमीटरचा प्रवास केला आहे.
ओसीरिस-आरएक्स हे पृथ्वीवर येणार नाहीय, तर एका बंदिस्त कॅप्सुल ते पृथ्वीवर सोडणार आहे. ओसीरिस-आरएक्सने आधीपासूनच दुसऱ्या मोहिमेला सुरुवात केली आहे. उटाहमधील रेतीमध्ये एक खोली तयार करण्यात आली आहे. हे नमुने तिथे ठेवले जाणार आहेत. यानंतर ते सोमवारी ह्यूस्टन येथील नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरमधील प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत.