जीवसृष्टीचा शोध घेणार नासाचे चांद्रयान
By Admin | Published: February 13, 2017 12:23 AM2017-02-13T00:23:49+5:302017-02-13T00:23:49+5:30
चंद्रावरील जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी नासा चंद्रावर यान पाठविणार आहे. याबाबतचा एक अहवाल नासाने नुकताच सादर केला आहे
वॉशिंग्टन : चंद्रावरील जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी नासा चंद्रावर यान पाठविणार आहे. याबाबतचा एक अहवाल नासाने नुकताच सादर केला आहे. या अहवालात तीन लक्ष्यांवर मत मांडण्यात आले आहे. चंद्रावरील जीवसृष्टीचे पुरावे एकत्र करणे हे प्रमुख लक्ष्य आहे. ती जागा राहण्यायोग्य आहे का? आदींवर अभ्यास करण्यात येणार आहे.
याबाबत चर्चा करण्यासाठी नासाने मार्च आणि एप्रिल महिन्यात दोन बैठकांचे आयोजन केले आहे. प्रामुख्याने ‘युरोपा’वर ही मोेहीम चालविण्यात येणार आहे. या बर्फाळ भागात खारे पाणी असण्याची शक्यताही वैज्ञानिक व्यक्त करत आहेत.
पृथ्वीनंतर जीवसृृष्टी असण्याची शक्यता असलेला हा ग्रह आहे. मंगळावरील जीवसृष्टीच्या शोधासाठी नासाकडून
सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. हा त्याचाच
एक भाग आहे.