नासाचे ऐतिहासिक उड्डाण, सूर्याच्या दिशेने झेपावले 'सोलर प्रोब यान'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 01:32 PM2018-08-12T13:32:17+5:302018-08-12T13:33:53+5:30
रविवारी दुपारी एक वाजता नासाने आपले सोलर प्रोब यान सूर्याच्यादिशेने प्रक्षेपित केले. नासाची ही ऐतिहासिक झेप असून..
वॉशिंग्टन - नासाने ऐतिहासिक झेप घेतली असून सोलर पार्क प्रोब यान आकाशात झेपावले आहे. रविवारी दुपारी एक वाजता नासाने आपले सोलर प्रोब यान सूर्याच्यादिशेने प्रक्षेपित केले. सूर्यामध्ये होणाऱ्या गुढ स्फोटांचा, त्याच्या कार्यप्रणालीचा अभ्यास हे यान करणार आहे. रामायणकाळात मारुतीरायांनी लहान असताना फळासारखे लालबुंद दिसणाऱ्या सूर्याला गिळण्यासाठी झेप घेतल्याचा उल्लेख आहे.
नासाचे आकाशात सूर्याच्या दिशेने उड्डाण केलेले यानही एका कारच्या आकाराएवढे असून ते सूर्याच्या पृष्ठभागापासून 40 लाख मैल दुरवरून त्याच्या कार्यकक्षेचा अभ्यास करणार आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत सूर्याच्या उष्णतेचा आणि प्रखर प्रकाशाचा कोणत्याही यानाने सामना केलेला नाही.
3-2-1… and we have liftoff of Parker #SolarProbe atop @ULAlaunch’s #DeltaIV Heavy rocket. Tune in as we broadcast our mission to “touch” the Sun: https://t.co/T3F4bqeATBpic.twitter.com/Ah4023Vfvn
— NASA (@NASA) August 12, 2018