'मंगळ'वार; नासाच्या 'इनसाईट' यानाचं मंगळावर यशस्वी लँडिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 08:47 AM2018-11-27T08:47:15+5:302018-11-27T13:08:12+5:30
नासाच्या 'इनसाईट मार्स लँडर' यानाचे मंगळ ग्रहावर यशस्वी लँडिंग झाले आहे. सोमवार (26 नोव्हेंबर) आणि मंगळवार (27 नोव्हेंबर)च्या दरम्यान भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 1 वाजून 24 मिनिटांनी इनसाईट यान मंगळ ग्रहावर उतरले आहे.
नासाच्या 'इनसाईट मार्स लँडर' यानाचे मंगळ ग्रहावर यशस्वी लँडिंग झाले आहे. सोमवार (26 नोव्हेंबर) आणि मंगळवार (27 नोव्हेंबर)च्या दरम्यान भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 1 वाजून 24 मिनिटांनी इनसाईट यान मंगळ ग्रहावर उतरले आहे. मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर यान उतरताना 19,800 किमी प्रति तास वेगाने जाणारे हे यान सहा मिनिटांत शून्य वेगावर आले. त्यानंतर यान पॅराशूटमधून बाहेर आले आणि लँड झाले. नासाकडून याचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले.
मंगळ ग्रहावरील रहस्य जाणून घेण्यासाठी हे यान तयार करण्यात आले आहे. इनसाईटने मंगळ ग्रहावरुन आपले पहिले छायाचित्रही पाठवले आहे. नासाच्या या प्रकल्पासाठी 1 बिलियन डॉलर म्हणजेच 70 अब्ज रुपये खर्च आला आहे. सौर ऊर्जा आणि बॅटरीने ऊर्जा मिळवणाऱ्या लँडरला 26 महिन्यांपर्यंत संचलित केले जाऊ शकते. परंतु, नासाला यापेक्षा अधिक कालावधी ते सुरू राहू शकेल अशी अपेक्षा आहे.
National Aeronautics and Space Administration (NASA) InSight mission has finally touched down on the red planet on Monday (local time; around 1 p.m. of November 27 IST) after seven months of traveling through space
— ANI Digital (@ani_digital) November 26, 2018
Read @ANI Story | https://t.co/xRGlTYqDGcpic.twitter.com/ddMKVraFTf
इनसाईट यान हे मंगळावरील मानव मिशनपूर्वी त्याच्या पृष्ठभागावर उतरणे आणि येणाऱ्या भूकंपाचे मापन करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. यानातील सिस्मोमीटरच्या मदतीने मंगळावरील अंतर्गत परिस्थितीचा अभ्यास केला जाईल.
My first picture on #Mars! My lens cover isn’t off yet, but I just had to show you a first look at my new home. More status updates:https://t.co/tYcLE3tkkS#MarsLandingpic.twitter.com/G15bJjMYxa
— NASAInSight (@NASAInSight) November 26, 2018