नासाला सापडली दुसरी पृथ्वी?
By Admin | Published: July 24, 2015 12:22 AM2015-07-24T00:22:27+5:302015-07-24T20:03:23+5:30
अमेरिकेच्या नासा अंतराळ संस्थेला पृथ्वीसारखाच व पृथ्वीच्याच आकाराचा एक ग्रह सापडला आहे. हा ग्रह ज्या ताऱ्याभोवती फिरतो
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या नासा अंतराळ संस्थेला पृथ्वीसारखाच व पृथ्वीच्याच आकाराचा एक ग्रह सापडला आहे. हा ग्रह ज्या ताऱ्याभोवती फिरतो त्याच्यापासून ग्रह इतक्या अंतरावर आहे, की त्यावर पाणी द्रव स्वरूपात असणे शक्य आहे. प्राथमिक संशोधनानुसार हा ग्रह पृथ्वीप्रमाणे खडकाळ आहे. नासाच्या पृथ्वीबाहेर जीवन शोधण्याच्या संशोधनातील हे फार महत्त्वाचे पाऊल मानण्यात येत आहे.
गुरुवारी नासातर्फे या संशोधनाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. केपलर दुर्बिणीच्या साहाय्याने नासाने केलेल्या संशोधनाची माहिती या पत्रकार परिषदेत दिली जाईल. २००९ साली हे संशोधन सुरू झाले, त्याअंतर्गत पृथ्वीबाहेर राहण्यासारखे ग्रह शोधले जात आहेत. गोल्डीलॉक झोन म्हणून हा प्रदेश ओळखला जातो.
केपलर दुर्बिणीने शोधलेले बहुतांश ग्रह वायूमय अवस्थेत होते, गोल्डीलॉक झोनमध्ये असणारे आठ ग्रह पृथ्वीपेक्षा कमी आकाराचे होते. पृथ्वीसारखाच व पृथ्वीच्या आकाराचा असा ग्रह प्रथमच मिळाला असून नासा त्याची माहिती देणार आहे. (वृत्तसंस्था)