मंगळ अभ्यासासाठी ‘नासा’चे यान झेपावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 06:30 AM2018-05-06T06:30:06+5:302018-05-06T06:30:06+5:30
मंगळ ग्रहावर भविष्यात प्रत्यक्ष माणसाला पाठविण्याआधी तेथील वातावरण व भूगर्भरचनेचा सखोल अभ्यास करण्यासाठी ‘नासा’ने शनिवारी ‘इनसाइट’ हे नवे यान रवाना केले. सन २०१२ मधील ‘क्युरिआॅसिटी रोव्हर’नंतर मंगळावर सोडलेले हे दुसरे यान आहे.
वॉशिंग्टन : मंगळ ग्रहावर भविष्यात प्रत्यक्ष माणसाला पाठविण्याआधी तेथील वातावरण व भूगर्भरचनेचा सखोल अभ्यास करण्यासाठी ‘नासा’ने शनिवारी ‘इनसाइट’ हे नवे यान रवाना केले. सन २०१२ मधील ‘क्युरिआॅसिटी रोव्हर’नंतर मंगळावर सोडलेले हे दुसरे यान आहे.
कॅलिफोर्नियातील व्हेंडेनबर्ग हवाईदल तळावरून, ‘अॅटलास-५’ हा अग्निबाण या यानास घेऊन झेपावला. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरून ‘नासा’ने केलेले हे पहिलेच प्रक्षेपण होते. सर्व नीट झाल्यास ‘इनसाइट’ २६ नोव्हेंबरला मंगळावर उतरेल. तिथे त्यातून एक यांत्रिक हात बाहेर येईल व तोे ‘सेस्मोमीटर’ नावाचे उपकरण मंगळाच्या पृष्ठभागावर ठेवेल. (वृत्तसंस्था)
‘सेस्मोमीटर’ हे उपकरण मंगळावरील भूकंपांचा अभ्यास करेल. दुसरे उपकरण हे खोदकाम करणारे असेल. ते १० ते १६ फूट खणून ग्रहाच्या आतील वातावरणाच्या नोंदी करेल.