नासाचे स्पेस एक्स लाँच; 9 वर्षांनंतर अमेरिकेचे अंतराळवीर अंतराळात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 04:43 AM2020-05-31T04:43:44+5:302020-05-31T04:44:17+5:30
फ्लोरिडा : अमेरिकी अंतराळ संस्था नासाने ९ वर्षांनंतर इतिहास रचला आहे. फ्लोरिडाच्या केप कनवरल येथील जॉन एफ केनेडी स्पेस ...
फ्लोरिडा : अमेरिकी अंतराळ संस्था नासाने ९ वर्षांनंतर इतिहास रचला आहे. फ्लोरिडाच्या केप कनवरल येथील जॉन एफ केनेडी स्पेस सेंटरमधून नासाने स्पेसएक्स डेमो-२ मिशन लाँच केले आहे. अमेरिकेने ९ वर्षांनी त्यांच्या जमिनीवरून अंतराळवीर पाठविले आहेत.
चंद्रावर उतरण्याचे पहिले उड्डाण याच केंद्रावरून करण्यात आले होते. नासाचे संचालक जीम ब्राईडेन्स्टीन यांनी सांगितले की, अमेरिकेने ९ वर्षांनी त्यांच्या जमिनीवरून अंतराळवीर पाठविले आहेत. मला नासावर आणि टीमवर गर्व आहे. हे लाँच अमेरिका आहे.
#WATCH SpaceX Falcon 9 rocket takes off with the SpaceX Crew Dragon spacecraft for International Space Station, with 2 NASA astronauts – Robert Behnken and Douglas Hurley. pic.twitter.com/83aXfAtK1d
— ANI (@ANI) May 30, 2020
नासाने यावेळी स्पेसएक्स फाल्कन ९ हे रॉकेट पाठविले आहे. यामध्ये रॉबर्ट बेंहकेन आणि डग्लस हुर्ले हे दोन अंतरालवीर आहेत. हे यान पृथ्वीच्या कक्षेबाहेर यशस्वीरित्या गेले असून कॅप्सूल यशस्वीरित्या उघडल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले.