नासाची सुर्यावर स्वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2017 03:43 PM2017-05-30T15:43:23+5:302017-05-30T16:33:47+5:30

सूर्यावर पाठवण्यात येणारी नासाची ही पहिलीच मोहिम असणार आहे

NASA's Survival Invasion | नासाची सुर्यावर स्वारी

नासाची सुर्यावर स्वारी

Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 30 - नासा सूर्यावर पाठवण्यासंबंधी आपल्या मोहिमेसंबंधी महत्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. या मोहिमेअंतर्गत नासा सूर्याला स्पर्श करुन परत येणार आहे. सूर्यावर पाठवण्यात येणारी नासाची ही पहिलीच मोहिम असणार आहे. नासा  अवकाश यान पाठवणार असून आतापर्यंत सूर्याच्या जवळ कोणीच जाऊ शकलं नाही तितक्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न नासा करणार आहे. अवकाश यानाला फक्त सर्वोच्च तापमानच नाही तर किरणोत्साराचा सामना करावा लागणार आहे.
 
बुधवारी नासा एका विशेष कार्यक्रमात आपल्या सोलार प्रोब प्लस मिशनसंबंधी महत्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम टीव्ही तसंच एजन्सीच्या वेबसाईटवर लाईव्ह पाहता येणार आहे. हे अंतराळ यान 2018 मध्ये उन्हाळ्यात सूर्यासाठी रवाना होईल. सूर्याशी संबंधित जास्तीत जास्त माहिती गोळा करण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे. सूर्याचा सर्वात बाहेरील भाग "कोरोना"चे तापमान कशाप्रकारे वाढते ? यामागे काय प्रक्रिया आहे ? याची उलगडा करण्याचा प्रयत्न केला जाईल. 
 
कोरोना
सूर्याच्या अंतर्गत घडामोडींवर आपल्या सौरमालेच्या प्रत्येक ग्रहाचे वातावरण ठरते. सूर्याच्या हजारो कि.मी पर्यंत पसरलेल्या बाहय थराला कोरोना असे म्हणतात. सूर्याच्या थाळीपेक्षा जो आतला थर कोरोना त्याचे तापमान दशलक्ष केव्हिनने जास्त असते.  सूर्यापासून निघणार्‍या ज्वालांना उत्तर ध्रुवावर ‘अरोरा बोरीयालिस’ तर दक्षिण ध्रवावर त्यांना ‘अरोरा अ‍ॅस्ट्रोलीस’ असे म्हणतात. कोरोनाचे तापमान हे फॉस्फरसपेक्षा इतके जास्त कसे हा सौर भौतिकीला पडलेला महत्वाचा प्रश्‍न आहे.
 
सूर्याचा बाह्य थर पृष्ठभागाशी तुलना करता शेकडो पटीने जास्त तापलेला असतो. याचं तापमान पाच लाख डिग्री सेल्सिअसपेक्षाही जास्त असू शकतं. नासाचं अवकाश यान सूर्याच्या कक्षेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करेल. या अवकाश यानाला जितका तापमान आणि किरणोत्साराचा सामना करावा लागणार आहे, तितका कदाचित आजपर्यंत कोणत्याच अवकाश यानाला करावा लागला नसेल. या मोहिमेमुळे आतापर्यंत उलगडा न झालेल्या अनेक गोष्टींची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
 

 

Web Title: NASA's Survival Invasion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.