मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 06:01 AM2024-09-29T06:01:26+5:302024-09-29T06:01:46+5:30

Israel Hizbullah WAr: नसरल्ल्लाने तीन दशकांपेक्षाही अधिक काल दहशतवादी संघटना हिजबुल्लाचे नेतृत्व केले. त्याच्या मृत्यूमुळे मध्य पूर्वेतील संघर्ष नाट्यमयरीत्या बदलू शकतो. 

Nasrallah death, the eldest son, was killed in 1997; Conflict will increase in the Middle East | मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार

मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार

बैरुत : इस्रायलने लेबनॉनची राजधानी बैरुतवर केलेल्या हवाई हल्ल्यात कट्टरपंथी संघटना हिजबुल्ला नेता हसन नसरल्ला ठार झाल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला. हल्ल्यात नसरल्ल्ला यांचा खात्मा झाल्याची पुष्टी केली आहे. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नसरल्ला आपले सहकारी शहिदांमध्ये सामील झाले. हिजबुल्लाह शत्रू विरोधात आणि पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ युद्ध सुरू ठेवण्याची शपथ घेत आहे, असेही यात म्हटले आहे. 

नसरल्ल्लाने तीन दशकांपेक्षाही अधिक काल दहशतवादी संघटना हिजबुल्लाचे नेतृत्व केले. त्याच्या मृत्यूमुळे मध्य पूर्वेतील संघर्ष नाट्यमयरीत्या बदलू शकतो. हसन नसरल्ल्लाची चार मुलंही हिजबुल्लाशी संबंधित होती. त्याचा मोठा मुलगा हिजबुल्ला सेनानी होता आणि तो १९९७ मध्ये इस्रायली हल्ल्यात मारला गेला. 

खामेनेईंचे टेन्शन वाढले 
हिजबुल्लाचा प्रमुख सय्यद हसन नसरल्लाचा ‘खात्मा’ झाल्याने आता इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहेे. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्याची माहिती रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

मुलगी जैनबचाही मृत्यू
इस्रायली वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, नसरल्लाशिवाय त्यांची मुलगी जैनबचाही या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
इस्रायलने हल्ला केलेल्या कमांडर सेंटरमध्ये नसरल्लाच्या मुलीचा मृतदेह सापडला होता.

नसरल्ला कोण होता?

  • ६४ वर्षीय नसरल्ला याचा जन्म बैरूतच्या शारशाबौकमध्ये एका गरीब शिया मुस्लीम कुटुंबात झाला होता. 
  • लेबनॉनमधील गृहयुद्धामुळे लहानपणीच त्याच्या कुटुंबाला विस्थापित व्हावे लागले. 
  • वक्तृत्व व संघटन कौशल्याच्या बळावर तो एक क्रांतिकारक म्हणून उदयास आला. वयाच्या १६ व्या वर्षी तो इराकमधील नजफमध्ये गेला.
  • इराणी क्रांतिकारक अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांच्याकडून त्याने इस्लामचे शिक्षण घेतले. हिजबुल्लाची स्थापना करणाऱ्या मोजक्या संस्थापकांत नसरल्लाचा समावेश होता. 
  • नसरल्लाच्या पश्चात पत्नी फातिमा यासीन, तीन मुले जवाद, मोहंमद-माहदी व मोहंमद अली आणि एक मुलगी जैनब असा परिवार आहे. 

Web Title: Nasrallah death, the eldest son, was killed in 1997; Conflict will increase in the Middle East

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.