अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 09:39 AM2024-09-29T09:39:08+5:302024-09-29T09:39:08+5:30
Hassan Nasrallah Killed: इस्रायलने लेबनॉनची राजधानी असलेल्या बेरूतवर टाकलेले बॉम्ब अमेरिकेने भेट म्हणून दिले होते. या हल्ल्यात हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाह मारला गेला, असा आरोप इराणने केला आहे.
इस्रायलने गाझा आणि लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांत अमेरिकेच्या भागिदारीने इराण संतापला आहे. इस्रायलने लेबनॉनची राजधानी असलेल्या बेरूतवर टाकलेले बॉम्ब अमेरिकेने भेट म्हणून दिले होते. या हल्ल्यात हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाह मारला गेला, असा आरोप इराणने केला आहे.
इराणने म्हटले आहे की, या हल्ल्यात इस्रायलने अमेरिकेने दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या बंकर बस्टर बॉम्बचा वापर केला आहे. मात्र, आपल्याला या हल्ल्यासंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती नव्हती, असे अमेरिकेने म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, हिजबुल्लाह ही एक दहशतवादी संघटना असून तिला इराणचे समर्थन आहे.
हिजबुल्लाहचा कमांडर आणि नसरल्लाहची मुलगीही ठार -
IDF ने शनिवारी हिजबुल्लाहचा प्रमुख नसरल्लाह मारला गेल्याची माहिती दिली होती. तसेच, एक्सवर पोस्ट करत, 'आता हसन नसराल्लाह जगात दहशत पसरवू शकणार नाहीत', असे म्हटले आहे. हसन नसरल्ला 32 वर्षे हिजबुल्लाहचा प्रमुख होता. या हवाई हल्ल्यात 6 इमारतींना निशाणा बनवण्यात आले होते. ज्यांत नसरल्लाह लपलेला होता. या हल्ल्यात नसरल्लाह शिवाय, मिसाइल युनिटचा कमांडर मुहम्मद अली इस्माइल आणि त्याचा सहकारी हुसेन अहमद इस्माईलही मारला गेला. महत्वाचे म्हणजे, नसरल्लाहची मुलगी जैनब नसरल्लाहदेखील या हल्ल्यात ठार झाली आहे.
The Israeli @IDF confirms that Hassan Nasrallah, the leader of the Hezbollah terrorist organization and one of its founders, was eliminated yesterday, together with Ali Karki, the Commander of Hezbollah’s Southern Front, and additional Hezbollah commanders.
— Israel ישראל (@Israel) September 28, 2024
Nasrallah will no… pic.twitter.com/aThduf0bwe
अमेरिकेचा इस्रायलला पाठिंबा -
हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाच्या मृत्यूवर अमेरिकेची प्रतिक्रिया आली आहे. राष्ट्रपती ज्यो बायडेन यानी नसरल्लाहचा मृत्यू "एका न्यायाचे माप" असल्याचे म्हटले आहे. याच बरोबर, अमेरिकेने इस्रायलकडून इराण समर्थित वेग-वेगळ्या दहशतवादी संघटनांविरोधात करण्यात येत असलेल्या हल्ल्यांना समर्थन असल्याचे म्हटले आहे.