चीनच्या वाढत्या आक्रमक वृत्तीविरुद्ध नाटोच्या धर्तीवर 'क्वाड' चालणार, अमेरिकेनं केलं स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 07:59 AM2020-09-02T07:59:38+5:302020-09-02T08:03:29+5:30
आम्हाला इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आपले हितसंबंध सहकार्यातून वाढवायचे आहेत. क्वाडकडे नैसर्गिकरीत्या भागीदार देशांची संघटना म्हणून पाहिले पाहिजे.
दुसर्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या नेतृत्वात नाटोने (उत्तर अटलांटिक ट्रीटी संघटना) ज्या मार्गाने कम्युनिस्ट सोव्हिएत युनियनच्या विरोधात अमेरिकेचे नेतृत्व केले, त्याच धर्तीवर आता चीनच्या वाढत्या आक्रमक वृत्तीविरुद्ध अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील 'क्वाड' (क्वाड्रिलेटरल सिक्योरिटी डायलाग) ही आघाडी ठोस आकार घेऊ लागली आहे.
क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांमध्ये आता साप्ताहिकरीत्या चर्चा होत आहे. ज्यात दक्षिण कोरिया, व्हिएतनाम आणि न्यूझीलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या उच्च अधिका-यांसह सुरुवातीच्या चार देशांचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर, क्वाडच्या चारही देशांचे परराष्ट्र मंत्री लवकरच नवी दिल्लीत बैठक घेण्याच्या तयारीत आहेत. यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम येथे झालेल्या चर्चेदरम्यान अमेरिकेचे उप परराष्ट्रमंत्री स्टीफन बीगन यांनी ही सर्व माहिती दिली. बीगन यांनी हेदेखील स्पष्ट केले आहे की, क्वाड हे केवळ चीनविरुद्ध आघाडी म्हणूनच स्थापन केलेले नाही, परंतु त्यांनी ज्या पद्धतीनं क्वाडची तुलना नाटोशी केल्यानं सर्व रणनीती स्पष्टपणे दर्शवते.
अशा कोणत्याही युतीचा अधिक व्यापक सकारात्मक अजेंडा असावा, परंतु त्याच वेळी ते म्हणाले की, नाटो ज्या पद्धतीने केवळ 12 देशांनी सुरू केली, परंतु नंतर ती 27 देशांची झाली. त्याच प्रकारे, क्वाड देखील सुरू केले जाऊ शकते, परंतु त्यात इंडो-पॅसिफिक क्षेत्राव्यतिरिक्त इतर प्रदेशांतील देशांचा देखील समावेश असू शकतो. त्यांनी भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम आणि न्यूझीलंडच्या परराष्ट्र सचिवांमधील साप्ताहिक चर्चेचा खुलासा केला. ते म्हणाले की, एक अतिशय चांगला संवाद आहे आणि आम्हाला इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आपले हितसंबंध सहकार्यातून वाढवायचे आहेत. क्वाडकडे नैसर्गिकरीत्या भागीदार देशांची संघटना म्हणून पाहिले पाहिजे.
अमेरिकेच्या उप परराष्ट्रमंत्र्यांनीही खुलासा केला आहे की, 'क्वाडची पुढील मंत्रिमंडळ बैठक लवकरच नवी दिल्लीत होणार आहे. मला विश्वास आहे की, क्वाड ही संकल्पना भारताला इंडो-पॅसिफिक आणि त्याही पलीकडे भरारी घेण्यास मदत करेल. भारत हा आमचा मित्र आहे हे आमच्या हिताचे आहे. हे उल्लेखनीय आहे की क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची पहिली बैठक सप्टेंबर 2019मध्ये न्यूयॉर्कमध्ये झाली होती. जरी क्वाडची स्थापना 2007 मध्ये झाली होती, परंतु चार देशांनी 2016पासूनच याकडे नव्याने पाहण्यास सुरुवात केली आहे.
आता पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे, तर क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची नवी दिल्ली येथे होणारी भेट ही चीनसाठी एक मोठी रणनीतिक व मुत्सद्दी संकेत असेल. क्वाडच्या तीन सदस्य देशांनी (भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया) चीनच्या पुरवठा साखळीला मंगळवारी ज्या पद्धतीने पर्याय दिला आहे, त्यावरून चीनवरही आर्थिक दबाव आणला जाईल, असे ते म्हणत आहेत. भारत, जपान आणि अमेरिका यांच्यातील लष्करी अभ्यासामध्ये ऑस्ट्रेलियाचा समावेश करण्याची घोषणाही लवकरच करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत जो विजय मिळवितो, त्याला एक मोठी पसंती असेल, असेही बीगन यांनी नमूद केले.