उत्तर प्रदेशच्या गुप्ता परिवारामुळं गेली दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांची खुर्ची
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 11:11 AM2018-02-15T11:11:37+5:302018-02-15T11:16:26+5:30
अनेक घोटाळ्यांनी कलंकित झालेले दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
जोहनसबर्ग - उत्तर प्रदेशच्या गुप्ता परिवारामुळं दक्षिण आफ्रिकेच्या जेकब झुमा यांना राष्ट्राध्यक्ष पद सोडावं लागले. दक्षिण आफ्रिकेत औद्योगिक वसाहत तयार करणारे भारताच अजय गुप्ता यांच्यासह त्यांच्या तीन भावाच्या घरी जोहनसबर्ग पोलिसांनी काल छापा मारला. गुप्ता परिवारातील एका सदस्याला यावेळी अटकही करण्यात आली आहे. याचवेळी सत्तेत असलेल्या आफ्रिकी नॅशनल काँग्रेसने झुमा यांना पद सोडण्यासाठी सांगितले. गुप्ता परिवारावर झुमा यांच्यासोबत घोटाळा केल्याचा आरोप आहे. गुप्ता परिवार उत्तरप्रदेशमधील सहारनपुरमधील आहे.
1993मध्ये उद्योगासाठी गुप्ता परिवाराने दक्षिण आफ्रिकेत स्थलांतर केलं होतं. तरुण वयामध्ये अजय गुप्ता यांची काहीतरी मोठं करण्याची जिद्द त्यांना दिल्लीतून आफ्रिकेत घेऊन गेली. राजोश आणि अतुल या दोन भावासोबत त्यांनी दक्षिण आफ्रिकेत सहारा कंप्यूटर्सची स्थापना केली. यामधून फायदा होताच अनेक कंपन्यासोबत मिळून त्यांनी आपलं काम सुरु केलं. लग्जरी गेम, वृत्तमान पत्र, न्यूज चॅनलमध्ये आपली भागिदारी केली. अजेय गुप्ता यांच्यावर दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेक भष्ट्राचाराचे आरोप आहेत. यामध्ये राष्ट्रपती झुमा यांचाही संबध असल्याचे समोर आलं आहे. पण झुमा यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. झुमा म्हणाले की, गुप्ता परिवाराशी माझे कोणतेही व्यवसायिक संबध नाहीत, त्यांच्यासोबत माझे फक्त मैत्रीचे नाते आहेत.
पक्षाच्या केंद्रीय समितीच्या सलग १३ तास झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर मंगळवारी पहाटे झुमा यांना पदावरून दूर करण्यावर पक्षात एकमत झाले. आज झुमा यांनी राष्ट्रध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. या अनिश्चितीमुळे दक्षिण आफ्रिकेची सूत्रे सध्या नक्की कोणाच्या हाती आहेत, हे कळेनासे झाले आहे. दरवर्षी राष्ट्राध्यक्षांकडून संसदेपुढे केले जाणारे ‘स्टेट आॅफ दि नेशन’ भाषण झाले नाही. आता २१ फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पाचे काय होणार याविषयी नागरिक साशंक आहेत. त्यातच पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. सन १९९४ मध्ये वर्णभेदी गोरी राजवट अस्ताला जाऊन दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकाची पहिली निवडणूक झाली तेव्हा नेस्लन मंडेला यांच्या उत्तुंग नेतृत्वाने सत्तेवर आलेला ‘एएनसी’ हा पक्ष आताही सत्तेवर आहे. परंतु दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये या पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागला होता. मंडेला यांच्या नंतर राष्ट्राध्यक्ष झालेल्या थाबो एमबेकी यांना सत्तेच्या दुरुपयोगाच्या आरोपावरून झुमा समर्थकांनी पक्ष संघटनेतील ‘रिकॉल’च्या अधिकाराचा वापर करून पदावरून दूर केले होते. आता तेच अस्त्र झुमा यांच्यावर उगारण्यात आले आहे.