टाटा स्टीलचं राष्ट्रीयीकरण हा उपाय नाही - डेविड कॅमेरॉन

By admin | Published: March 31, 2016 04:38 PM2016-03-31T16:38:26+5:302016-03-31T16:39:08+5:30

टाटा स्टीलचं राष्ट्रीयीकरण करणं हा उपाय नसल्याचं सांगत ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी संकटात असलेल्या स्टील उद्योगाला वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले

Nationalization of Tata Steel is not a solution - David Cameron | टाटा स्टीलचं राष्ट्रीयीकरण हा उपाय नाही - डेविड कॅमेरॉन

टाटा स्टीलचं राष्ट्रीयीकरण हा उपाय नाही - डेविड कॅमेरॉन

Next
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 31 - टाटा स्टीलचं राष्ट्रीयीकरण करणं हा उपाय नसल्याचं सांगत ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी संकटात असलेल्या स्टील उद्योगाला वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले. दर दिवशी लाखो पौंडाचा तोटा सहन करत असलेल्या टाटा स्टीलने 10 वर्षांपूर्वी विकत घेतलेली कोरस म्हणजे इंग्लंडमधला स्टील उद्योग विकत असल्याची घोषणा केली आणि इंग्लंडमधल्या सगळ्यांचे धाबे दणाणले. पोर्ट टालबोट या 100 वर्षांपेक्षा जुन्या पोलाद क्षेत्रात टाटा स्टीलमध्ये 17 हजार कर्मचारी काम करतात. त्याखेरीज आणखी सुमारे 25 हजार असा 40 ते 42 हजार जणांचा रोजगार संकटात आला असून पंतप्रधान डेविड कॅमेरॉन कुटुंबासोबत घालवत असलेली सुट्टी अर्ध्यावर टाकून तोडगा काढण्यासाठी आले आहेत.
कर्मचारी, सरकारमधील सदस्य आणि टाटा स्टीलचे अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून मार्ग काढण्यात येईल असे कॅमेरॉन यांनी पत्रकारांना सांगितले. कंपनीचे तात्पुरते राष्ट्रीयीकरण करता येईल का, या प्रश्नावर कॅमेरॉन यांनी सगळे पर्याय खुले असल्याचे सांगितले. आणि पाठोपाठच राष्ट्रीयीकरण हा पर्याय होऊ शकत नाही असेही स्पष्ट केले.

Web Title: Nationalization of Tata Steel is not a solution - David Cameron

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.